महात्मा बसवेश्वर सार्वजनिक जयंती महोत्सव समिती च्या वतीने बसव चषक २०२३ खुल्या टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे आयोजन

  महात्मा बसवेश्वर सार्वजनिक जयंती महोत्सव समिती च्या वतीने बसव  चषक २०२३   खुल्या टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे आयोजन 




लातूर : जगतज्योती महात्मा बसवेश्वर सार्वजनिक जयंती महोत्सव समितीच्या वतीने लातुरात दि. १५ ते २२ एप्रिल २०२३ या कालावधीत भव्य खुल्या टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धा रिंग रोडवरील गुरु हॉटेलच्या पाठीमागे असलेल्या पंचमुखी हनुमान मंदिरजवळच्या भव्य पटांगणावर होणार आहेत. 
या स्पर्धेचे प्रथम पारितोषिक एक लाख रुपयांचे असून द्वितीय पारितोषिक ५१ हजार रुपये आहे. मॅन  ऑफ द सिरीज ११ हजार, बेस्ट बॅट्समन पाच हजार तर बेस्ट बॉलरसाठी पाच हजार रुपयांचे पारितोषिक देण्यात येणार आहे. या स्पर्धेतील प्रत्येक सामना आठ षटकांचा तर अंतिम सामना दहा  षटकांचा असणार आहे. स्पर्धेसाठी प्रवेश शुल्क ५ हजार १०० रूपे ठेवण्यात आली आहे. स्पर्धेचे संयोजक औसा शिवरुद्र मुर्गे , निलंगा अविनाश रेशमे ,चाकूर युवराज पाटील, देवणी  ईश्वर पाटील, सुरज मुळे , अहमदपूर स्वप्नील व्हत्ते, उदगीर कुणाल बागबंदे, शिरूर अनंतपाळ  गणेश शेटे, रेणापूर शेखर हलकुडे, जळकोट गजेंद्र किडे, धुळशेट्टे, तर शिरूर ताजबंदचे प्रताप पाटील  हे आहेत. 
    या स्पर्धेत जास्तीत जास्त संघांनी  आपला सहभाग नोंदवून स्पर्धा यशस्वी कराव्यात असे आवाहन जगतज्योती महात्मा बसवेश्वर सार्वजनिक जयंती महोत्सव समितीचे अध्यक्ष केदारप्पा  रासुरे , उपाध्यक्ष भीमाशंकर गाढवे, शिरिषप्पा हत्ते , मुख्य संयोजक इंजि. राजकुमार नाईकवाडे,  श्रीनिवास लांडगे, सचिन स्वामी, शंकर बोळेगावकर , जयप्रकाश गुट्टे, गणेश हेरकर, मंगेश पटणे , ऋषी पाटील, अमित जाधव यांसह  संयोजन समितीच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी केले आहे. 

Post a Comment

أحدث أقدم