लामजना पाटी येथे खासदार फंडातून हायमास्ट लाईट चा शुभारंभ

लामजना पाटी येथे खासदार फंडातून हायमास्ट लाईट चा शुभारंभ 




औसा तालुक्यातील लामजना पार्टी येथील शिवछत्रपती शिवाजी महाराज चौक लामजना पाटी येथे दिनांक 17 एप्रिल रोजी धाराशिव लोकसभा खासदार ओमराजे राजे निंबाळकर यांच्या हस्ते हाय मस्ट लाईटचा लोकार्पण  सोहळा झाला. 
 लामजना पाटी येथील शिवछत्रपती शिवाजी महाराज चौकातील महाराजांच्या अश्वारुढ पुतळ्यासमोर धाराशिव लोकसभा मतदारसंघाचे खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या खासदार निधीतून दहा लाख रुपये खर्च करून दोन हाय मस्ट पथदिवे उभारून त्यांचे खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या हस्ते सर्वप्रथम छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून हाय मस्ट लाईटचे फीत कापून पथदिवे चालू करून लोकार्पण करण्यात आले. 
यावेळी महाराष्ट्र राज्य बाजार समिती सहकारी संघाचे उपसभापती संतोष भाऊ सोमवंशी, जिल्हाप्रमुख शिवाजी माने, शिवसेना औसा तालुका प्रमुख सतीश शिंदे, युवा सेना जिल्हाप्रमुख दिनेश जावळे, शिवसेनेचे बजरंग जाधव, माजी जिल्हा नियोजन समिती लिंबं महाराज रेशमे, बाजार समितीचे उपसभापती किशोर जाधव, खरेदी विक्री संघाचे उपसभापती शेखर चव्हाण, शहर प्रमुख सुरेश भुरे युवा सेना तालुका प्रमुख महेश सगर, युवा सेना उपजिल्हाप्रमुख अभिजीत जाधव, उप तालुकाप्रमुख श्रीराम कुलकर्णी, माजी मजूर फेडरेशन अध्यक्ष सुग्रीव लोंढे, दीपक बिराजदार, संजय उजळंबे ,तानाजी सुरवसे आकाश सितापूरे, रामेश्वर मुळे ,संजय लोंढे ,उपसरपंच राम बिराजदार, ,बजरंग बाजुळगे, आपचुंदा चेअरमन कमलाकर माने, मोगरगा सरपंच रविकांत निकम, विजय बाजुळगे, बप्पा माडजे, गोविंद बापू बिराजदार, धनराज चांदुरे ,इस्माईल सय्यद, श्रीराम बोडके, किशोर उत्के, धानोरा सरपंच सुरेश मुसळे, हिप्परसोगा सरपंच मनोज सोमवंशी , सुधाकर मुगळे, गोविंद ससाने ,ऋषी पाटोदकर यांच्यासह लामजना परिसरातील पंचक्रोशीतील शिवसैनिक शिवप्रेमी नागरिक उपस्थित होते.

Post a Comment

أحدث أقدم