कर्नाटक विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीमुळे सीमा भागातील मद्यविक्री राहणार बंद

 कर्नाटक विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीमुळे

सीमा भागातील मद्यविक्री राहणार बंद

लातूर: भारत निवडणूक आयोगाने कर्नाटक विधानसभा सार्वत्रिक निवडणूक कार्यक्रम 29 मार्च 2023 रोजी जाहीर केला आहे. त्यानुसार 10 मे 2023 रोजी मतदान आणि 13 मे 2023 रोजी मतमोजणी होणार आहे. त्यामुळे मतदान प्रक्रिया संपण्यापूर्वी 48 तासापासून ते मतदान संपेपर्यंततसेच मतमोजणी दिवशी लातूर जिल्ह्यातील निलंगादेवणीउदगीर तालुक्यातील कर्नाटक सीमा लगतच्या म्हणजेचे सीमेपासून पाच किलोमीटर परिसरातील मद्यविक्री बंद राहणार आहे. जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी. यांनी याबाबतचे आदेश निर्गमित केले आहेत.

कर्नाटक विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी 10 मे रोजी मतदान होत असल्याने 8 मे 2023 रोजीच्या सायंकाळी 6 पासून ते 10 मे 2023 रोजीच्या सायंकाळी 6 वाजेपर्यंततसेच मतमोजणी दिवशी 13 मे 2023 रोजी संपूर्ण दिवसभर लातूर जिल्ह्यातील कर्नाटक सीमालागतच्या पाच किलोमीटरमधील परिसरातील सर्व प्रकारची मद्यविक्री बंद राहील.

निवडणुका मुक्तनिष्पक्ष आणि शांततेत पार पाडण्यासाठीलोकप्रतिनिधी कायदा, 1951 चे कलम 135 सी प्रमाणे संबंधित मतदारसंघाच्या लगतच्या भागात दारू विक्रीवर बंदी घालण्यात आली आहे. महाराष्ट्र दारूबंदी कायदा, 1949 च्या कलम 142 नुसार प्राप्त अधिकारांचा वापर करून जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी. यांनी लातूर जिल्ह्यातील सीमावर्ती भागातील किलोमीटर परिसरातील निलंगादेवणीउदगीर तालुक्यांतील दारू आणि ताडी विक्रीची सर्व दुकाने बदं ठेवण्याहे आदेश निर्गमित केले आहेत. या आदेशाचे उल्लंघन केल्यास संबंधितांचे परवाने रद्द करण्यात येतीलअसेही या आदेशात नमूद करण्यात आले आहे.

Post a Comment

أحدث أقدم