महात्मा बसवेश्वर नागरी सहकारी पतसंस्थेला यंदा २३ लाख ५५ हजार रुपयाचा नफा

 महात्मा बसवेश्वर नागरी सहकारी पतसंस्थेला यंदा २३ लाख ५५ हजार रुपयाचा नफा                            







मुरूम, ता. उमरगा, ता. ११ (प्रतिनिधी) : येथील श्री महात्मा बसवेश्वर नागरी सहकारी पतसंस्थेची   बसव सहकार भवन या  इमारतीत सोमवारी (ता. १०) रोजी पतसंस्थेचे चेअरमन शिवशरण वरनाळे यांच्या अध्यक्षतेखाली बैटक पार पडली. मार्च अखेरचा ताळेबंद, नफातोटा व विविध विषयावर चर्चा झाली. या पतसंस्थेचे यंदाचे १३ वे वर्ष असून यंदाच्या आर्थिक वर्षात या पतसंस्थेस २३ लाख ५५ हजार ८६६ रुपयाचा निव्वळ नफा झाला आहे. या पतसंस्थेकडे यंदा १ कोटी २१ लाख ६९ हजार ५०० रुपयाचे वसुल भाग भांडवल, ८ कोटी ८४ लाख ७६ हजार ४५१ रुपयाच्या ठेवी, संस्थेने ७ कोटी ९३ लाख ७७ हजार ८७३ रुपयाचे कर्ज वाटप केले आहे. संस्थेची गुंतवणूक २ कोटी ९० लाख ७४ हजार ८३९ रुपये असून या संस्थेचे ३९१२ सभासद आहेत. ऑडीट वर्ग 'अ ' दर्जा प्राप्त असून संपूर्ण संगणकीकृत पतसंस्था आहे. सध्या पतसंस्थेची वाटचाल शासकीय धोरणानुसार कॅशलेस व्यवहाराकडे चालू आहे. दोन वर्षापासून आर.टी.जी.एस.,एन.एफ.टी.  ची सुविधेसह क्यु.आर.कोड व मोबाईल बॅकिंगचा लाभ सभासद घेत आहेत. ठेवीच्या अनेक योजना असून यात महालक्ष्मी लखपती योजना, गणेश युवा मंगल योजना, स्वप्नपुर्ती योजना, सरस्वती मासिक प्राप्ती ठेव योजना, स्वामी विवेकानंद ठेव योजना, ए.पी.जे अब्दुल कलाम शिक्षण ठेव योजना, महावितरण कंपनीचे वीज बील भरणा केंद्र,११ टक्के सोने तारण कर्ज, ११. ५० टक्के वेअर हाऊस तारण, १३ टक्के तारण कर्ज, १४ टक्के सामान्य कर्ज आदी सोयी ग्राहकांच्या फायदयासाठी संस्थेकडून पुरविल्या जातात. संस्थेकडून लवकरच  सभासदांसाठी लाॅकर उपलब्ध करुन दिले जाईल. लवकर जिल्ह्यात अन्य ठिकाणी शाखा सुरू करण्यात येणार येणार आहेत. या बैठकीत पतसंस्थेचे उपाध्यक्ष शरणप्पा मुदकण्णा, संचालक अशोक जाधव, अमृत वरनाळे, आनंदराव बिराजदार, बाबासाहेब पाटील शाखाधिकारी दत्तात्रय कांबळे, कॅशिअर चिदानंद स्वामी, धीरज मुदकण्णा,  प्रशांत काशेट्टे, सचिन कंटेकूरे, संतोष मुदकण्णा, महातंय्या स्वामी, गुंडेराव गुरव आदींसह कर्मचारीवृंद व सभासद यांच्या सहकार्यांने पतसंस्था यशस्वीरित्या वाटचाल करीत आहे. यंदा ठेवीमध्ये वाढ, थकीत कर्जदारांवर कडक कार्यवाही करून वसुली करण्यात येत असून यंदाची सर्वसाधारण सभा १२ मे वर्धापनदिनी घेणार असल्याचे चेअरमन शिवशरण वरनाळे यांनी माहिती दिली.


Post a Comment

أحدث أقدم