सायली कणसे हिला विद्यापीठाचा रासेयो उत्कृष्ट स्वयंसेविका पुरस्कार जाहीर

 सायली  कणसे हिला विद्यापीठाचा रासेयो उत्कृष्ट स्वयंसेविका पुरस्कार जाहीर

 लातूर-युवा कार्यक्रम व खेळ मंत्रालय भारत सरकार यांच्यावतीने महाविद्यालय युवकांचा व्यक्तिमत्व विकास घडवण्याच्या हेतूने राष्ट्रीय सेवा योजना ही प्रत्येक महाविद्यालयामध्ये राबवली जाते. त्याचप्रमाणे दयानंद कला महाविद्यालय,लातूर येथे राष्ट्रीय सेवा योजना विभाग अविरतपणे चालू आहे. त्याच विभागाची सायली माधव कणसे या स्वयंसेविकेस स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ,नांदेड. यांच्या वतीने देण्यात येणारा 2020- 21 चा उत्कृष्ट राष्ट्रीय सेवा योजना स्वयंसेविका पुरस्कार जाहीर झाला आहे.
    सायली कणसे ही मूळची लातूर येथील रहिवासी आहे. तिने उच्च शिक्षणासाठी दयानंद कला महाविद्यालयामध्ये प्रवेश घेतला व  उच्च शिक्षणाबरोबरच तिने राष्ट्रीय सेवा योजना विभागांमध्ये सुद्धा प्रवेश घेतला. 2019-20 व 2020-21 या दोन वर्षाच्या कालावधीमध्ये महाविद्यालयाच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या सर्व उपक्रमांमध्ये व वार्षिक शिबिर तसेच जिल्हास्तरीय, विद्यापीठ स्तरीय, युवती नेतृत्व विकास कार्यशाळा मध्ये सहभाग त्याचबरोबर राज्यस्तरीय आव्हान -चान्सलर्स ब्रिगेड: आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण शिबिर मध्ये सहभाग, राष्ट्रीय स्तरावरील राजीव गांधी युनिव्हर्सिटीऑफ हेल्थ सायन्स, कर्नाटक यांच्या संयुक्त विद्यमाने श्री. श्री. कॉलेज ऑफ आयुर्वेदिक सायन्स अँड रिसर्च, बंगलोर येथे राष्ट्रीय एकत्मता शिबिरासाठी सहभाग घेतला, त्याचबरोबर महाविद्यालयीन जीवनामध्ये सायली कणसे हिने केलेल्या या उल्लेखनीय, अनुकरणीय, प्रशंसनीय सेवेची दखल घेऊन स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ,नांदेड राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने सायली कणसे हिला राष्ट्रीय सेवा योजना उत्कृष्ट स्वयंसेविका पुरस्कार जाहीर झाला आहे.
     त्यानिमित्ताने तिचा दयानंद कला महाविद्यालयामध्ये सत्कार करण्यात आला याप्रसंगी प्राचार्य डॉ. शिवाजी गायकवाड कार्यालयीन अधीक्षक रूपचंद कुरे व हरिप्रसाद प्रयाग आदी उपस्थित होते.
     दयानंद शिक्षण संस्थेचे अध्यक्ष लक्ष्मीजीरमण लाहोटी, उपाध्यक्ष अरविंद सोनावणे, रमेशकुमार राठी,ललितभाई शहा, सरचिटणीस रमेश बियाणी, संयुक्त सचिव सुरेश जैन, कोषाध्यक्ष संजयजी बोरा, प्राचार्य डॉ.एस.पी.गायकवाड, उपप्राचार्य डॉ.प्रशांत मान्निकर, राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रमाधिकारी डॉ.सुभाष कदम डॉ.सुनिता सांगोले डॉ.मच्छिंद्र खंडागळे डॉ.संदिपान जगदाळे, डॉ.संतोष पाटील, प्रा.महेश जंगापल्ले. इत्यादींनी सायलीचे अभिनंदन केले आहे.

Post a Comment

أحدث أقدم