खासदार निधीतून छत्रपती शिवाजी महाराज अश्वारुढ पुतळ्याची रोषनाई – खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर
धाराशिव लोकसभा मतदार संघातील औसा तालुक्यातील लामजना येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक, लामजना पाटी येथे दि. 17/04/2023 रोजी खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांच्या स्थानिक विकास निधीतून हायमस्ट पथदिवे या विकास कामांचा लोकार्पण सोहळा संपन्न झाला.
गेली अनेक वर्षापासून मौजे. लामजना येथील छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारुढ पुतळा परिसर विद्युतीकरण नसल्याने पुतळा अंधारात होता. संपुर्ण महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या लामजना येथील पुतळ्याच्या समोर विद्युतीकरण करण्यासाठी शिवप्रेमी व नागरिकांकडून मागणी करण्यात आल्यानंतर तात्काळ छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर खासदार स्थानिक विकास निधीमधून हायमस्ट पथदिवे या विकास कामासाठी 10 लक्ष रुपयांचा निधी दिला व सदरील चौकाचे विद्युतीकरण करुन खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांच्या हस्ते सर्वप्रथम छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारुढ पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन हायमस्ट पथदिव्यांचे लोकार्पण करण्यात आले.
याप्रसंगी महाराष्ट्र राज्य बाजार समिती सहकारी संघाचे उपसभापती संतोष भाऊ सोमवंशी, जिल्हाप्रमुख शिवाजीराव माने, शिवसेना औसा तालुकाप्रमुख सतीश शिंदे, युवासेना जिल्हाप्रमुख दिनेश जावळे, शिवसेनेचे बजरंग जाधव, माजी जिल्हा नियोजन समिती लिंब महाराज रेशमे, बाजार समितीचे उपसभापती किशोर जाधव, खरेदी विक्री संघाचे उपसभापती शेखर चव्हाण, शहर प्रमुख सुरेश भुरे, युवा सेना तालुकाप्रमुख महेश सगर, युवा सेना उपजिल्हाप्रमुख अभिजीत जाधव, उप तालुकाप्रमुख श्रीराम कुलकर्णी, माजी मजूर फेडरेशन अध्यक्ष सुग्रीव लोंढे, दीपक बिराजदार, संजय उजळंबे, तानाजी सुरवसे, आकाश सितापूरे, रामेश्वर मुळे, संजय लोंढे, उपसरपंच राम बिराजदार, बजरंग बाजुळगे, आपचुंदा चेअरमन कमलाकर माने, मोगरगा सरपंच रविकांत निकम, विजय बाजुळगे, बप्पा माडजे, गोविंद बापू बिराजदार, धनराज चांदुरे, इस्माईल सय्यद, श्रीराम बोडके, किशोर उत्के, धानोरा सरपंच सुरेश मुसळे, हिप्परसोगा सरपंच मनोज सोमवंशी, सुधाकर मुगळे, गोविंद ससाने, ऋषी पाटोदकर यांच्यासह लामजना परिसरातील पंचक्रोशीतील शिवसैनिक, शिवप्रेमी, नागरिक उपस्थित होते.
إرسال تعليق