केशवराज माध्यमिक विद्यालयात महात्मा फुले जयंती

 केशवराज माध्यमिक विद्यालयात  महात्मा फुले जयंती


     लातूर/प्रतिनिधी:येथील श्री केशवराज माध्यमिक विद्यालयात मंगळवारी (दि.११)महात्मा ज्योतीराव फुले यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. 
    यावेळी पर्यवेक्षक संदीप देशमुख,बबन गायकवाड यांची मंचावर प्रमुख उपस्थिती होती.
प्रतिमा पूजनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली.क्रांतीसूर्य महात्मा  ज्योतीबा फुले यांच्या जीवन कार्याची ओळख करून देताना  अमृता केंद्रे ही विद्यार्थीनी म्हणाली की,महात्मा ज्योतीराव फुले यांनी समाजासाठी केलेली कामगिरी कधीही न विसरता येण्यासारखी आहे.शिक्षण महिलांसाठी महत्त्वाचे आहे. याचाच एक भाग म्हणून त्यांनी आपली पत्नी सावित्रीबाई फुले यांना शिकवले.भारतातील पहिली महिला शिक्षिका म्हणून सावित्रीबाई फुले यांचे कार्य माेलाचे आहे.ज्योतिबा फुले एक आदर्श व्यक्तिमत्त्व होते.अनिष्ट रूढी व परंपरांविरुद्ध त्यांनी आयुष्यभर लढा दिला.
       संस्कार  मंडळांतर्गत आयोजित या कार्यक्रमाचे प्रास्ताविक,परिचय व  आभारप्रदर्शन आदिती पाटील हिने केले.रामेश्वरी दिवाण हिच्या कल्याणमंत्राने कार्यक्रमाची सांगता झाली.
    मुख्याध्यापक प्रदीप कुलकर्णी व उपमुख्याध्यापक तथा विद्यासभा संयोजक महेश कस्तुरे यांच्या मार्गदर्शनात संपन्न झालेल्या या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अभ्यासपूरक मंडळ प्रमुख श्रीमती शैलजा देशमुख,संस्कार मंडळ प्रमुख श्रीमती अर्चना ठोंबरे तसेच सर्व शिक्षक,शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

Post a Comment

أحدث أقدم