प्रसिद्ध गप्पाष्टकार डॉ. संजय उपाध्ये यांचा
लातूरात ‘मन करा रे प्रसन्न’ कार्यक्रम
लातूर - आयुष्य कसे जगावे असे सांगणारा एक नॉन अध्यात्मिक प्रवचन, ज्ञान, आध्यात्म, मनोरंजन आणि प्रबोधन यांचा अपूर्व संगम असलेला महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध गप्पाष्टकार डॉ. संजय उपाध्ये यांचा मन उल्हासित करणारा एक अनोखा मनोरंजक असा जो देश विदेशात गाजलेला ‘मन करा रे प्रसन्न’ हा कार्यक्रम परशुराम जयंती उसत्व समितीवतीने मंगळवार दि.१८ एप्रिल २०२३ रोजी सायं ६.०० वा. दयानंद कॉलेज सभागृह, लातूर येथे विधान परिषदेचे सदस्य तथा भाजपाचे जिल्हाध्यक्ष आ. रमेशअप्पा कराड यांच्या आग्रहाखातर आयोजन करण्यात आले आहे.
आपले विचारच आपल्याला घडवत असतात. तसेच आपल्या व्यक्तिमत्त्वाचे प्रतिनिधित्व आपले विचारच करत असतात. माणसाच्या दुःखाचे मूळ हे त्याच्या चुकीच्या विचार पद्धतीत शोधून आयुष्य कसे जगावे, अशी नवी हास्य थेरपी डॉ. संजय उपाध्ये यांनी आपल्या ‘मन करा रे प्रसन्न’ या कार्यक्रमाद्वारे संपूर्ण समाजासमोर मांडली आहे.
आपण बिनशर्त स्वतःचा स्वीकार करून स्वतःकडून टोकाच्या अपेक्षा करण्यापेक्षा हे भयंकर आहे परंतू एवढेही वाईट नाही असा विचार करावा. अतिरेकी विचारांचा ताबा विवेकनिष्ठ विचारांना घेऊ द्यावा. असे केल्यास आनंदाने जगणे निवडता येऊ शकते. स्वतःचा माणूस म्हणून स्वीकार करुन स्वतःवर प्रेम करा. अशा प्रकारे जीवनाला नवा संदेश देणारा हा कार्यक्रम लातूरकरांच्या जीवनाला नवी कलाटणी देईल.
मंगळवार दि.१८ एप्रिल २०२३ रोजी सायं ६.०० वा. दयानंद कॉलेज सभागृह, लातूर येथे आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाचा जास्तीत जास्त लातूरकरांनी लाभ घ्यावा. असे आवाहन परशुराम जयंती उसत्व समितीचे अॅड. संजय पांडे, पापासेठ ताथोडे व जगदीश कुलकर्णी यांनी केले आहे.
إرسال تعليق