महात्मा बसवेश्वर महाविद्यालयाचे एच.एस.सी.बोर्ड परीक्षा (फेब्रुवारी/मार्च) 2023 मध्येे घवघवीत यश

 महात्मा बसवेश्वर महाविद्यालयाचे एच.एस.सी.बोर्ड परीक्षा (फेब्रुवारी/मार्च) 2023 मध्येे घवघवीत यश


लातूर. –महात्मा बसवेश्वर महाविद्यालयातील १२ वी कला, वाणिज्य, विज्ञान आणि व्होकेशनल शाखेच्या  विद्यार्थ्यांनी महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक विभागीय मंडळातर्फे फेब्रु/मार्च -2023 यावर्षी घेतलेल्या परीक्षेमध्ये प्रतिवर्षाप्रमाणे यंदाही गुणवत्ते‍ची परंपरा कायम राखून घवघवीत यश मिळवले आहे.
विज्ञान शाखेचे 429 विद्यार्थी परीक्षेला बसले होते त्यामध्ये 10 विद्यार्थी विशेष प्राविण्यासह उत्तीर्ण झाले. तसेच 84 विद्यार्थी प्रथम श्रेणीमध्ये उत्तीर्ण व 239 विद्यार्थी द्वितीय श्रेणीतून उत्तीर्ण झाले. विज्ञान शाखेचा एकूण निकाल 89.04% लागला असून यामध्ये कु. धनुरे वरदा  उदयकुमार ही 86.67  टक्के गुण मिळवून महाविद्यालयातून प्रथम आली आहे. तसेच चि. कुलकर्णी सोहम शैलेश हा 85% गुण मिळवून महाविद्यालयातून द्वितीय व कु. बुरांडे शिवानी शिवराज 81.33% गुण मिळवून तृतीय आलेली आहे.
तसेच विज्ञान शाखेचे विद्यार्थी चि. शिंदे नागेश भागवत व कु. भांडारगे राजश्री बालासाहेब यांनी पाली विषयांमध्ये 100 पैकी 100 गुण मिळवले व कु. धनुरे वरदा  उदयकुमार हिला इलेक्ट्रॉनिक विषयांमध्ये 200 पैकी 200 गुण मिळवले.
कला शाखेचे 142 विद्यार्थी परीक्षेला बसले होते त्यामध्ये पंधरा विद्यार्थी विशेष प्राविण्यासह उत्तीर्ण झाले. तसेच 22 विद्यार्थी प्रथम श्रेणीमध्ये उत्तीर्ण व 43 विद्यार्थी द्वितीय श्रेणीतून उत्तीर्ण झाले. कला शाखेचा एकूण निकाल 76.76% लागला असून यामध्ये कु. निर्मल करीना नारायण ही 90.00 टक्के गुण मिळवून कला शाखेतून  प्रथम आली आहे. तसेच कू. देवकते स्नेहा तुकाराम ही 85% मिळवून द्वितीय व चि. कांबळे सिद्धू उद्धव  81.33% गुण मिळवून तृतीय आलेला आहे.
कला शाखेचा विद्यार्थीनी कू. पांचाळ भक्ती मनोजकुमार हि पाली विषयांमध्ये शंभर पैकी शंभर गुण मिळवून उत्तीर्ण झालेली आहे.
वाणिज्य शाखेचे 243 विद्यार्थी परीक्षेला बसले होते त्यामध्ये 23 विद्यार्थी विशेष प्राविण्यासह उत्तीर्ण झाले. तसेच 51 विद्यार्थी प्रथम श्रेणीमध्ये उत्तीर्ण झाले व 102 विद्यार्थी द्वितीय श्रेणीतून उत्तीर्ण झाले. वाणिज्य शाखेचा एकूण निकाल 86.72% लागला असून यामध्ये चि. ढेकळे प्रतीक ज्योतिराम याने 88.17 % गुण मिळवत वाणिज्य शाखेतून प्रथम आला आहे. तसेच कू. अष्टके प्राजक्ता महादेव व चि. शेख मोहम्मद उबेद इकबाल यांनी 85.33% मिळवून द्वितीय व चि. नागराळे अभिषेक प्रकाश   84.50% गुण मिळवून तृतीय क्रमांक मिळवला आहे.
एम.सी.व्ही.सी शाखेचे 71 विद्यार्थी  परीक्षेला बसले होते त्यामध्ये 01 विद्यार्थी विशेष प्राविण्यासह उत्तीर्ण झाला आहे. तसेच 25 विद्यार्थी प्रथम श्रेणीमध्ये उत्तीर्ण झाले व 17 विद्यार्थी द्वितीय श्रेणीतून उत्तीर्ण झाले. वाणिज्य शाखेचा एकूण निकाल 87.32% लागला असून यामध्ये चि. कलमे नागेश संजय याने 76.17 % गुण मिळवत एम. सी. व्ही. सी. शाखेतून प्रथम आला आहे.
या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष शिवशंकर मल्लिकार्जुन आप्पा बिडवे, उपाध्यक्ष माधवराव त्र्यंबकराव पाटील (तपसे चिंचोलीकर), सचिव श्री मन्मथआप्पा पांडबाप्पा लोखंडे, कोषाध्यक्ष श्री अभिमन्यू वीरभद्रअप्पा रासुरे, कार्यकारी संचालक ॲड. काशिनाथ गुणवंतआप्पा साखरे व सर्व संचालक मंडळाने अभिनंदन केले.
या सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्का्र महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. दिनेश मौने, उपप्राचार्य डॉ. राजकुमार लखादिवे, उपप्राचार्य प्रा. एस. व्ही. पवार, उपप्राचार्य प्रा. बी. एम. जाधव यांच्या हस्ते् करण्यात आला. यावेळी पर्यवेक्षक प्रा. एस आर हावळे, समन्वयक प्रा. वनिता पाटील, प्रा. नितीन वाणी, प्रा. रवींद्र सोनोने, प्रा. विश्वानाथ स्वामी, प्रा. कल्पना गिराम, प्रा. डॉ. घनश्याम ताडेवर, प्रा. रविंद्र सुरवसे, प्रा. पांढरे जी. एल.  तसेच महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर यांनी गुणवंत विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.

Post a Comment

أحدث أقدم