जिल्हास्तरीय जादूटोणा विरोधी कायदा जनजागृती प्रचार आणि प्रसार कार्यक्रम अंमलबजावणी समितीवर होणार अशासकीय सदस्याची नियुक्ती
लातूर : जादुटोणा विरोधी कायदा जनजागृती प्रचार आणि प्रसार कार्यक्रम अंमलबजावणी जिल्हास्तरीय समितीवर जादूटोणा विरोधी व अंधश्रध्दा निर्मुलनासाठी कार्य करणाऱ्या व्यक्तीची अशासकीय सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात येणार आहे. तरी जादूटोणा व अंधश्रद्धा निर्मुलन या क्षेत्रात उल्लेखनिय काम करणाऱ्या इच्छुक व्यक्तींनी आपले प्रस्ताव १२ मे २०२३ पर्यंत सहायक आयुक्त समाज कल्याण कार्यालय, लातूर येथे सादर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
समाजात रुजलेल्या काही अनिष्ट, अघोरी, अमानुष संस्कारातून रुजलेल्या अनेक प्रकारच्या गैरसमजूतीमुळे होणारे शोषण व छळ थांबविण्यासाठी व समाजाचे मानसिक स्वास्थ सुधारण्यासाठी शासनाने २० डिसेंबर २०१३ रोजी महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष, अनिष्ट व अघोरी प्रथा व जादूटोणा यांना प्रतिबंध घालण्याबाबत व त्यांचे समुळ उच्चाटन करण्याबाबत अधिनियम २०१३ जारी केला आहे.
या कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी, तसेच संस्कारातून रुजलेल्या गैरसमजुतीमुळे जातीयता, उच्चनिचता, गटपंथांमधील परस्पर द्वेष, स्त्री-पुरुष असमानता, दारिद्र्य अशा मानवतेसाठी घातक असणाऱ्या गोष्टी विरोधी कायदा जनजागृती प्रचार कार्यक्रम अंमलबजावणी समितीची (पीआयएमसी) शासन निर्णय ०२ मार्च २०२२ नुसार पुनर्रचना करण्यात आलेली आहे. तसेच २८ जून २०२२ च्या शासन निर्णयानुसार जिल्हास्तरावरील जादूटोणा विरोधी कायदा जनजागृती प्रचार आणि प्रसार कार्यक्रम अंमलबजावणीसाठी जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय समिती गठीत करण्यात आली आहे.
जादुटोणा विरोधी कायदा जनजागृती प्रचार आणि प्रसार कार्यक्रम अंमलबजावणी जिल्हास्तरीय समितीवर जादूटोणा विरोधी व अंधश्रध्दा निर्मुलनासाठी कार्य करणाऱ्या व्यक्तीची राज्यस्तरीय पीआयएमसी अध्यक्ष व सहअध्यक्ष यांच्या मान्यतेने आणि समाज कल्याण आयुक्त यांच्या सहमतीने अशासकीय सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात येणार आहे. तरी जादूटोणा व अंधश्रद्धा निर्मुलन या क्षेत्रात उल्लेखनिय काम करणाऱ्या इच्छुक व्यक्तींनी आपले प्रस्ताव १२ मे २०२३ पर्यंत सहायक आयुक्त समाज कल्याण कार्यालय, लातूर येथे सादर करावेत. अधिक माहितीसाठी समाज कल्याण कार्यालयातील समाज कल्याण निरीक्षक संदेश घुगे (भ्रमणध्वनी क्र. ९४०५४४६२१६), कनिष्ठ लिपिक डी. एस. पांढरे डी. एस. (भ्रमणध्वनी क्र. ९८२३७६८१८८) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन समाज कल्याण सहायक आयुक्त यांनी केले आहे.
إرسال تعليق