साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विकास महामंडळाची नवीन 45 टक्के बीज भांडवल योजना

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विकास महामंडळाची नवीन 45 टक्के बीज भांडवल योजना

लातूर : साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विकास महामंडळामार्फत सन 2023-24 या आर्थिक वर्षात 45 टक्के बीज भांडवल ही नवीन योजना सुरु करण्यात आली आहे. या योजनेचे 75 प्रकरणांचे उद्दिष्ट प्राप्त झाले असून इच्छुक लाभार्थ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक आर. जी. दरबस्तेवार यांनी केले आहे.
बीज भांडवल योजनेमध्ये 50 टक्के राष्ट्रीयकृत बँकेचे कर्ज, 45 टक्के महामंडळाचे कर्ज (10 हजार रुपये अनुदानासह) आणि उर्वरित 5 टक्के अर्जदाराचा सहभाग रक्कम राहील. मांग, मांतग, मिनी मादिग, मादिंग, दानखणी मांग, मांग, मांग महाशी, मदारी, राधे मांग, मांग गारुडी, मादगी, मादिगा या पोट जातीतील व्यक्तींना अर्थसहाय्य देण्यात येते. अर्जदार महाराष्ट्राचा रहिवासी असावा. तसेच वय 18 ते 50 वर्षे दरम्यान असावे. निवडलेल्या व्यवसायाचे अर्जदाराला ज्ञान व अनुभव असावा. या योजनेचा लाभ घेण्यासाठी ग्रामीण, शहरी भागातील उत्पन्न तीन लाखापेक्षा कमी असावे. कुटुंबातील पती व पत्नी यापैकी एकालाच योजनेचा लाभ घेता येईल.
बीज भांडवल योजनेच्या अधिक माहितीसाठी इच्छुकांनी जिल्हा व्यवस्थापक, साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विकास महामंडळ (मर्या), डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय विभाग, तळमजला शिवनेरी गेट समोर, डालडा फॅक्टरी कंपाऊंड, लातूर (दूरध्वनी क्र. 02382-257050) येथे संपर्क साधावा, असे आवाहन महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक आर. जी. दरबस्तेवार यांनी केले आहे.

-कर्ज प्रस्तावासोबत सादर करावयाची कागदपत्रे
बीज भांडवल योजनेसाठी प्रस्ताव सादर करताना जातीचा दाखला, उत्पन्नाचा दाखला, रेशनकार्ड, आधारकार्ड, पॅन कार्ड, मतदान ओळखपत्र, प्रकल्प अहवाल, कोटेशन, जागेचा पुरावा नमुना 8 अ, अनुभव प्रमाणपत्र दाखला इत्यादी कागदपत्रे सादर करणे आवश्यक आहे. 

Post a Comment

أحدث أقدم