मोदींच्या नेतृत्वाखाली देशातील कष्टकरी आणि शेतकरी वर्ग स्वावलंबी बनत आहे. – खा.सुधाकर शृंगारे

 मोदींच्या नेतृत्वाखाली देशातील कष्टकरी आणि शेतकरी वर्ग स्वावलंबी बनत आहे. – खा.सुधाकर शृंगारे

देशाचे नेते पंतप्रधान आदरणीय श्री.नरेंद्र जी मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशातील भाजपा सरकारने नुकतेच 9 वर्ष पुर्ण केल्याबद्दल भारतीय जनता पार्टी तर्फे पुर्ण देशभरात 30 मे ते 30 जुन दरम्यान एका विशेष जनसंपर्क अभियानाचे आयोजन करण्यात आलेले आहे. लातूर लोकसभा मतदारसंघक्षेत्रामध्ये या अभियानाचे नेतृत्व खा.सुधाकर शृंगारे हे करत असून या अभियानाच्या संपर्क से समर्थन या अभियानांतर्गत काल खा.सुधाकर शृंगारे यांच्यासह माजी खासदार श्री.सुनिल गायगवाड, शहर जिल्हाध्यक्ष श्री.गुरुनाथ मगे, शहर जिल्हा सरचिटणीस श्री.दिग्वीजय काथवटे यांनी लातूर शहरातील प्रतिष्ठीत नागरीक श्री.बस्वराज उडगे, शहरातील प्रतिष्ठीत डॉक्टर श्री.सदानंद कांबळे यांच्या हॉस्पिटलला, लातूर शहरातील प्रसिद्ध कापडाचे व्यापारी श्री.राजेशजी सोमाने, जिल्ह्यातील नामांकीत पत्रकार श्री.अरुणजी समुद्रे यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट दिली.

          या भेटीमध्ये भारतीय जनता पार्टीचे विचार, केंद्र सरकारचे गेल्या 9 वर्षातील प्रमुख कामे देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी मोदी साहेब यांचे विचार आणि त्यांच्या देशहितासाठीच्या संकल्पना सर्वांना सांगून यापुढे देखील येणाऱ्या काळात आपण सर्वांनी आपल्या देशाच्या विकासासाठी आणि देशातील 140 कोटी जनतेला स्वावलंबी बनवण्यासाठी भारतीय जनता पक्षाला आणि देशाचे पंतप्रधान आणि भारतीय जनता पक्षाला साथ देण्याचे आवाहन खा.सुधाकर शृंगारे यांनी केले.

          गेल्या 9 वर्षाच्या कार्यकाळात देशातील शेतकऱ्यांची स्वावलंबनाच्या दिशेने वाटचाल सुरु झाली असून या काळात शेतकरी, कष्टकरी आणि गरीबांच्या कल्याणाच्या दृष्टीने अनेक कल्याणकारी योजना आणि उपक्रम केंद्र सरकारने राबवीले असून यामुळे जागतीक पातळीवर आपल्या देशाचे स्थान उच्चस्थानी आले असून आपला देश आत्मनिर्भर होत असल्याचे खा.सुधाकर शृंगारे यांनी सांगितले.

          तसेच या विशेष अभियानांतर्गत ज्येष्ठ नागरीकांसमवेत स्नेहभोजन व संवादनिमीत्त कवठाळी, ता.चाकुर येथे आयोजीन स्नेहभोजन आणि संवादाच्या कार्यक्रमास ही खासदार श्री.सुधाकर शृंगारे हे माजी मंत्री भाजपा नेते श्री.विनायकराव पाटील यांच्या समवेत उपस्थित होते. याप्रसंगी उपस्थित सर्व ज्येष्ठ नागरीकांसमवेत स्नेहभोजन आणि संवाद साधुन खा.श्रृंगारे यांनी उपस्थित नागरीकांच्या अडीअडचणी जाणून घेऊन त्यांची आपुलकीने विचारपुस केली.

          तसेच पुढे बोलताना, गेल्या 9 वर्षाच्या काळात देशात विकासाची गंगा वाहत असून लातूर ला देखील रेल्वे कोच फॅक्टरीच्या माध्यमातुन देशाचे पंतप्रधान आदरणीय मोदी साहेबांनी एक महत्त्वकांक्षी प्रकल्प दिला असनू यामुळे लातूर च्या अर्थव्यवस्थेला गती मिळणार असून स्थानिक युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहे असेही खा.श्रृंगारे यांनी सांगीतले. गेल्या 9 वर्षात किसान सन्मान निधी योजना, प्रधानमंत्री आवास योजना, प्रधानमंत्री ग्राम सडक योजना, मनरेगा यांसारख्या योजनांच्यामुळे अनेक शेतकरी, कष्टकरी, मजुर, बेरोजगार यांना फायदा झाला असुन त्याना उदरनिर्वाहाचे साधन मिळाले आहे तसेच देशात लाखो बेघरांना घरे मिळाली असल्याचे खा. शृंगारे यांनी सांगितले.

Post a Comment

أحدث أقدم