रामनाथ कनिष्ठ महाविद्यालयात प्रा.कदम यांचा सेवापुर्ती निमित्त सत्कार

रामनाथ कनिष्ठ महाविद्यालयात प्रा.कदम यांचा सेवापुर्ती निमित्त सत्कार
 आलमला :- श्री रामनाथ कनिष्ठ महाविद्यालय अलमला येथे दिनांक 30जून 2023 रोजी विद्यालयाच्या प्रांगणात प्रा. अशोक कदम यांचा सेवापूर्ती निमित्त सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे सचिव श्री प्रभाकर कापसे हे उपस्थित होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून विश्वेश्वरय्या पॉलिटेक्निक चे सचिव श्री बसवेश्वर धाराशिवे हे उपस्थित होते. या कार्यक्रमांमध्ये प्रा.   अशोक कदम व त्यांच्या पत्नी सौ. अनिता कदम या दोघांचाही संस्थेच्या वतीने व विद्यालयाच्या वतीने भर पेहराव आहेर व भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला. सत्कारानंतर कदम सरांनी आपल्या शाळेप्रती भावना व्यक्त केल्या.या कार्यक्रमाला संस्थेचे जेष्ठ संचालक आलमलेकर सोपानराव, संस्थेचे अध्यक्ष एडवोकेट उमेश पाटील, उपाध्यक्ष श्री शिवाजीराव अंबुलगे, संचालक नरेंद्र पाटील, शिवशंकर धाराशिवे,  सोसायटीचे चेअरमन श्री विश्वनाथ बिराजदार, मांजरा शुगरचे माजी संचालक जयशंकर हुरदळे, माजी मुख्याध्यापक मुळे एस. के. माजी  शिक्षक आवटे ए. आय. तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष वीरभद्र बेरुळे, पोलीस पाटील सुरेंद्र पाटील, कमलेश निलंगेकर, विरनाथ अंबुलगे, शिवकुमार पाटील,  आलमला केंद्रातील सर्व घटक शाळांचे मुख्याध्यापक, विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ. अनिता पाटील, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी वर्ग, तसेच कदम सरांचे सर्व नातलग, कुटुंबीय व मित्रपरिवार सरांना सेवापूर्ती निमित्त शुभेच्छा देण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित होता. अध्यक्षीय समारोप श्री कापसे सर यांनी केला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. दांडगे भारत यांनी केले तर सूत्रसंचालन श्री पी.सी पाटील यांनी केले. व शेवटी आभार प्रा. हुंडेकर महालिंग यांनी मांडले.

Post a Comment

أحدث أقدم