आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर आनंदवारी च्या निमित्ताने रोट्रॅक्ट क्लब ऑफ लातूर आर्यावृत व इनरव्हील क्लबच्या सदस्यांनी घेतला भजन , पाउले , फुगडीचा आनंद

  आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर आनंदवारी च्या निमित्ताने रोट्रॅक्ट क्लब ऑफ लातूर आर्यावृत व इनरव्हील क्लबच्या 

सदस्यांनी घेतला  भजन , पाउले , फुगडीचा आनंद 
  लातूर  : आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर आनंदवारीच्या निमित्ताने
रोट्रॅक्ट क्लब ऑफ लातूर आर्यावृत व इनरव्हील क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने आषाढी एकादशी निमित्त भजन संध्या व सांप्रदायिक भजन , पाउले , फुगडीचा आनंद बाल वारकरी, रोट्रॅक्ट  व  इनरव्हील  क्लबच्या सदस्यांनी घेतला. ज्ञानोबा तुकारामाचा जयघोषात सर्वांनी पाउलांचा ठेका घेतला. 
 रोट्रॅक्ट क्लब ऑफ लातूर आर्यावृत व इनरव्हील क्लब ह्या  दोन्ही क्लबच्या वतिने हभप छायाताई वेळापुरे व हभप सविताताई शिंदे यांचा सन्मान केला. तसेच प्रमुख पाहुणे म्हणुन सौ शोभाताई पाटील ( माजी मनपा नगरसेवक) यांचाही सन्मान आदित्य शास्त्री, सुरेखा भारती, सौ शीतल गड्डिमे, काकासाहेब सुरवसे यांच्या हस्ते करण्यात आला. तसेच रोटरी क्लबचे संचालक  शामसुंदर मानधना  व रोट्रॅक्ट क्लब ऑफ लातुर आर्यावृतचे सल्लागार डॉ संजय जोगदंड  यांचाही सन्मान  करण्यात आला. यावेळी डॉ.  मैंदरकर मॅडम यांनी रोट्रॅक्ट क्लब ऑफ लातूर  आर्यावृतला औषधांचा बाॅक्स भेट दिला. व पुढेही मदत करु असे  आश्वासन दिले.
या कार्यक्रमास अध्यक्ष आर्यावृत आदित्य शास्त्री, सचिव काकासाहेब सुरवसे,    नुतन कोषाध्यक्ष विशाल शिरोळे , प्रकल्प प्रमुख प्रा.  शुभम पाटील , मयुर रत्नपारखे, सागर भिसे, डॉ नेहा हिरेमठ  , डॉ संजय जोगदंड, शामसुंदर मानधना, आचार्य चंद्रहास  शास्त्री, मिनाक्षी शास्त्री, परमेश्वर पवार ,नितिन चेंडके , मोटे   व  इनरव्हिल क्लब अध्यक्ष सौ.  सुरेखा भारती, सचिव सौ.  शीतल गड्डिमे, सौ.  सारिका गांधी, अनुराधा बेळंबे , डॉ वर्षा मैहंदरकर, मनीषा पुरी, ऋतुजा देशमुख, स्नेहा देशमुख, प्रीतम जाधव , ज्योती वर्मा, शीला यादव , रेशमा बोरा, डॉ प्रीती आग्रोया, सुचिता सूर्यवंशी, अनुराधा सोमाणी, चंद्रकला भार्गव मॅम , संध्या चोधरी, अंकिता कोटलवार , धनश्री जाधव  तसेच महिला भजनी मंडळ लता सनगले, पार्वती शिवनगे, तळेकर , वाले, बंडगर बबलु, ज्योती खेकडे, मुंडे , येरटे, मिटकरी, छाया वेळापुरे , स्वामी, सविता शिंदे  आदींची उपस्थिती होती.

Post a Comment

أحدث أقدم