शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे प्रश्न सोडवा अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा मराशिपरिषदेने दिला

शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे प्रश्न सोडवा
 अन्यथा आंदोलन  करण्याचा इशारा  मराशिपरिषदेने दिला 
लातूर /प्रतिनिधी- महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेच्या राज्य धोरणानुसार विविध मागण्यांचे निवेदन शिक्षणाधिकारी माध्यमिक यांचेकडे श्री शिंगडे अधिक्षक यांचे मार्फत महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद जि.लातूर च्या वतीने देण्यात आले. या मागण्यांची पुर्तता न झाल्यास कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्याचा ईशारा देण्यात आला आहे.यावेळी जिल्हाध्यक्ष शिवकुमार मुरगे, कार्यवाह दत्तात्रय पाटील, महानगर अध्यक्ष वेणूनाथ यादव, महानगर कार्यवाह राम जोशी,  विजय नळेगांवकर, मुख्याध्यापक राजकुमार कांबळे, भोंग आदि पधाधिकारी उपस्थित होते. 
      राज्यातील शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व शिक्षणातील प्रश्न समजून घेऊन ते सोडवण्यासाठी सातत्याने पाठपुरावा करणारी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद हि संघटना कामकरते.. या संघटनेची एक व दोन जून 2023 रोजी राज्य कार्यकारणी बैठक पुणे येथे झाली. सदर बैठकीमध्ये जिल्हास्तरावरील प्रलंबित मागण्यांच्या संदर्भात निवेदन देण्याचे ठरले. त्याप्रमाणे लातूर जिल्ह्यातील खालील मागण्या दिनांक 15 ऑगस्ट  पूर्वी पूर्ण कराव्यात अन्यथा आपल्या कार्यालयासमोर दिनांक १९ ऑगस्ट २०२३ रोजी आंदोलन करण्यात येईल. तत्पूर्वी मा.शिक्षणाधिकारी यांनी जिल्हा संघटना पदाधिकारी याना चर्चेस आमंत्रित करावे असेही नमूद करण्यात आले. यावेळी अनेक मागण्या मध्ये 1. दरमहा एक तारखेस वेतन मिळावे, भविष्य निर्वाह निधीची हिशोब पत्रिक दरवर्षी जून अखेर पर्यंत मिळावीत. 2. वैयक्तिक मान्यता, वरिष्ठ वेतन श्रेणी निवड श्रेणीच्या मान्यता, पर्यवेक्षक, उपमुख्याध्यापक, मुख्याध्यापक या पदोन्नतीच्या मान्यता भविष्य निर्वाह निधीची कर्ज प्रकरण, विनापरतावा प्रकरणे, अंतिम परतावा प्रकरणे, डीएड वेतनश्रेणीतून बीएड वेतन श्रेणी पदोन्नती प्रस्तावांचा निपटारा दाखल दिनांक पासून एक महिन्याच्या आत व्हावे. 3. सेवानिवृत्ती प्रस्तावाचा निपटारा दरमहा तत्परतेने करावा.  4. वैद्यकीय प्रतिपूर्ती प्रकरणे अतिशय संवेदनक्षम पद्धतीने व तातडीने मंजूर करावी. 5. सेवा जेष्ठता क्रम निश्चिती प्रकरण आवश्यकतेनुसार सुनावणी घेऊन दाखल दिनांक पासून एक महिन्यात निकाली काढावीत. 6. शिक्षक पाल्य शैक्षणिक शुल्क परतावा प्रकरणे दाखल दिनांकापासून एक महिन्यात निकाली काढावीत. 7. प्रभारी मुख्याध्यापक मान्यता जास्तीत जास्त सहा महिन्याचे असावे व जास्तीत जास्त तीन महिने प्रमाणे दोन वेळा देण्यात यावे. 8. सेवा हमी कायदा 2015 अन्वये शालेय शिक्षण विभागाच्या शासन निर्णयाची अंमलबजावणी तंतोतंत करावी. 9. प्रत्येक शिक्षकास सेवाजेष्ठता यादीची दरवर्षी सुधारित केलेली प्रत दिनांक 30 जून पूर्वी मिळावी. 10.दप्तर दिरंगाई विरोधी कायद्याची अंमलबजावणी सुद्धा तत्परतेने करावी 11.प्रत्येक मुख्याध्यापक शिक्षक व शिक्षकेत्तरास सेवा पुस्तकाची दुय्यम प्रत उपलब्द करून द्यावी. 12.प्रत्येक प्रशालेच्या मुख्याध्यापकाकडून प्रत्येक शिक्षकास खालील कागदपत्रांच्या त्यांच्या सहीने साक्षांकित केलेल्या सत्यप्रती मिळावी, नेमणूक आदेश, वैयक्तिक मान्यता, वरिष्ठ वेतनश्रेणी मान्यता, निवड श्रेणी मान्यता बदली मान्यता, सेवा जेष्ठता यादीची प्रत,मासिक वेतन हिशोब पत्रिका, (मंथली पे स्लीप), मासिक विविध रजा हिशोब पत्रिका. 13. प्रत्येक शिक्षकास वैयक्तिक मान्यता वरिष्ठ वेतनश्रेणी मान्यता निवड श्रेणी मान्यता इत्यादी मान्यतेच्या प्रति थेट संबंधित शिक्षक व शिक्षकेतरास मिळावी. 14. माननीय शिक्षणाधिकारी कार्यालयातील सर्वच अधिकारी व सेवकावर लिपिकावर निर्धारित केलेली कामे कोणती आहेत हे स्पष्ट करणारा बोर्ड कार्यालयाबाहेर लावावा. 15. वैयक्तिक मान्यतेचे सर्वच प्रकारचे प्रस्ताव कोणत्या विहित नमुन्यात सादर करावेत व त्यासोबत कोणकोणती कागदपत्रे जोडावीत याची संकलित हस्तपुस्तिका तयार करून प्रत्येक शाळेच्या मुख्याध्यापकास उपलब्ध करून द्यावे 16. शिक्षणाधिकारी कार्यालय पत्रव्यवहार इमेल द्वारेच करण्यात यावा. 17. शिक्षणाधिकारी कार्यालयांत येणाऱ्या संघटना पदाधिकारी कार्यकर्त्यांना व शिक्षक
कर्मचारी याना सन्मानजनक वागणूक मिळावी. 18. संघटना सहविचार सभा नियमितपणे आयोजित कराव्यात व कार्यवाही सुध्दा तत्परतेने करावी अशा मागण्या महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद जि.लातूर च्या वतीने करण्यात आल्या आहेत.

Post a Comment

أحدث أقدم