हासेगाव बी फार्मसी अंतिम वर्षाचा विद्यार्थ्यांना निरोप समारंभ


हासेगाव बी  फार्मसी अंतिम वर्षाचा  विद्यार्थ्यांना निरोप समारंभ  

                  औसा (प्रतिनिधी ) श्री वेताळेश्वर शिक्षण संस्था संचलित ,लातूर कॉलेज ऑफ फार्मसी हासेगाव  महाविद्यालयांमध्ये बी फार्मसी अंतिम  वर्गाच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ संपन्न झाला  या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले  संस्थेचे ,सचिव श्री वेताळेश्वर बावगे  ,कोषाध्यक्ष श्री शिवलिंगी  जेवळे, प्राचार्या श्यामलीला बावगे (जेवळे)  इत्यादी मान्यवर मंचावर  उपस्थित होते.  या कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती मातेच्या प्रतिमेचे पूजन करून मान्यवरांचा सत्कार महाविध्यालयतील  विद्यार्थ्यांच्या हस्ते करण्यात  आले,  
     या कार्यक्रमाचे प्रास्ताविक पर भाषण  प्राचार्या श्यामलीला बावगे (जेवळे)यांनी केले तर   औषधनिर्माण शास्त्राची  खूप मोठी  व्यापी आहे  यात विद्यार्थ्यांचं करियर आहे ,खूप  मोठी संधी आहे आणि या संधीच सोनं आपल्या विध्यार्थ्यानी करावं असे प्रतिपादन संस्थेचे  कोषाध्यक्ष  शिवलिंगी  जेवळे यांनी केले आणि   महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना   पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
            औरादे  यशवंत ,  ढमाले शैलेश , पारी ब्रिजेज ,बागल उषा,धनसुरे आकांक्षा , शेळके सुप्रिया , सायली डोंगरे , कोमल लोहकरे या  अंतिम वर्षातील विद्यार्थ्यांने एम फार्म फार्मास्यूटिक्स,रेग्युलेटरी अफेर्स पुढील भविष्यामध्ये शिक्षनाबद्दल आढावा सांगितले.  अंतिम वर्षातील विध्यार्थ्या चा अल्फसा उफहारानंतर राष्ट्रीय सेवा योजना  अंतर्गत  महाविद्यालयात वृक्षरोपण करण्यात आले.
    या कार्यक्रमाला शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी विध्यार्थी  उपस्थित होते . तसेच   प्रा जोशी दीपक यांनी हि आपले मनोगतव्यक्त करून  कार्यक्रमाचे सूत्रसंचालन  आणि  आभारप्रदर्शन  केले.

Post a Comment

أحدث أقدم