शिवराज्याभिषेक सोहळा घरघरात साजरा व्हावा-प्रा.संभाजी नवघरे

शिवराज्याभिषेक सोहळा घरघरात साजरा व्हावा-प्रा.संभाजी नवघरे 
लातूर/प्रतिनिधी -मराठा सेवा संघ लातुरच्या वतीने मराठा सेवा संघ जिल्हा कार्यालयात प्रा.संभाजी नवघरे राष्ट्रीय अध्यक्ष राष्ट्रसंत संत गाडगेबाबा प्रबोधन कक्ष यांचे व्याख्यान संपन्न झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बालासाहेब यादव होते सर्वप्रथम जिजाऊ वंदनेने कार्यक्रमाची सुरुवात झाली .
यावेळी प्रा.संभाजी नवघरे म्हणाले की छत्रपती शिवरायांनी केलेले शेतकऱ्यांविषयीचे कार्य,स्त्रियांना दिलेला सन्मान,मराठी भाषेला दिलेले सर्वोच्च स्थान,आणी स्वराज्याच्या माध्यमातून निर्माण केलेल्या लोककल्याणकारी राज्यकारभाराचा आदर्श आज सर्वांनी घेण्याची गरज आहे.शिवराज्यभिषेकाचा सोहळा महाराष्ट्रातील प्रत्येक घराघरात राष्ट्रीय उत्सव म्हणुन साजरा केला जावा.
सदरील व्याख्यानास कमलाकर आप्पा सुर्यवंशी, रंजनाताई चव्हाण,समाधानताई माने,हेंडगे हिराताई,ज्ञानेश्वर जाधव,सरकारने वकील पंडीतराव जाधव,रामभाऊ सुर्यवंशी, सुमनताई मेटे,संजय सुर्यंवंशी,कुमोद लोभे,प्रल्हाद ढवळे,लक्ष्मणराव जोगदंड, शैलेश भोसले यांच्या सह मोठ्या संख्येने उपस्थिती होती कार्यक्रमाचे प्रास्ताविक धनंजय उजनकर यांनी तर आभार उत्तमराव शेळके यांनी केले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मराठा सेवा संघ कार्यालयीन सचिव सदाशिव थोरात, विकास उपाडे यांनी प्रयत्न केले.

Post a Comment

أحدث أقدم