गोरसेनेचा रास्ता रोको; तीव्र आंदोलनाचा इशारा

 गोरसेनेचा रास्ता रोको; तीव्र आंदोलनाचा इशारा

लातूर : प्रतिनिधी
बोगस राजपूत भामटा यांनी अवैधरित्या जात प्रमाणपत्र काढून विजा-अ प्रवर्गात घुसखोरी केल्याने मूळ राजपूत भामटा यांचे आरक्षण पूर्णत: धोक्यात आलेले आहे. याच्या निषेधार्थ गोरसेना सामाजिक संघटनेच्या वतीन लातूर-अंबाजोगाई रोडवर दिग्विजय हॉटेलसमोर रास्ता रोको आंदोलन केले. मागील कित्येक दिवसांपासून बोगस राजपूत भामटा यांची अवैधरित्या घुसखोरी मोठ्या प्रमाणात सुरु आहे; ज्यामुळे विजा-अ मधील राजपूत भामटा यांचं आरक्षण पूर्णत: धोका आलेले आहे. ही अवैध घूसखोरी तात्काळ थांबवावी व जातवैधता प्रमाणपत्र देणा-या अधिका-यांवर योग्य ती कार्यवाही करावी, जातवैधता प्रमाणपत्र समितीवर एक सदस्य बंजारा समाजातील घेण्यात यावा आदी मागण्यासाठी संबंध महाराष्ट्रात एकाच दिवशी २५ जिल्ह्यांत गोर सेना सामाजिक संघटनेच्या वतीने आंदोलन करण्यात आले आहे. त्याचाच अनुषंगाने लातूर-अंबाजोगाई रोडवर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.प्रशासनने यांचा गांभीयाने विचार करुन योग्य ती बोगस जातं प्रमाणपत्र काढणा-या व त्याचा उपभोग घेणा-यांवर नाही केली तर संपूर्ण महाराष्टात गोर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रा. संदेशभाऊ चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली गोर सेनेच्या वतीने तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे. सदरील आंदोलन गोर सेनेचे जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. संतोष पवार, बबलू जाधव, जयसिंग जाधव, शरद राठोड,द यानायक राठोड, बालाजी राठोड, दयानंद राठोड, ओमराज राठोड, बंटी राठोड, अक्षय चव्हाण, विकास बंजारा, उमाकांत पवार, अमोल राठोड, धोंडीराम चव्हाण आदी गोर सेनेच्या पदाधिकारी यांची उपस्थिती होती.

Post a Comment

أحدث أقدم