बाल वयातच विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळावे - डॉ. एम. आर. पाटील

 बाल वयातच विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळावे - डॉ. एम. आर. पाटील

शारदा सेमी इंग्लिश स्कूलच्या पालक मेळाव्यास प्रतिसाद
 लातूर, दि. २५ - विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होण्यासाठी बाल वयापासूनच त्याला गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळणे गरजेचे आहे. यासाठी रॉयल एज्युकेशन सोसायटीतील सर्व शाळा व महाविद्यालये कटिबध्द आहेत, असे प्रतिपादन रॉयल एज्युकेशन सोसायटीचे संस्थापक अध्यक्ष डॉ. एम. आर. पाटील यांनी केले.
 नुकत्याच शाळांच्या शैक्षणिक वर्षाला प्रारंभ झाला आहे. याबद्दल डॉ. एम. आर. पाटील यांनी संस्थेच्या शारदा सेमी इंग्लिश स्कूलमधील विद्यार्थी व पालकांशी संवाद साधला. यावेळी शाळेचे मुख्याध्यापक लक्ष्मण पुरी, शिक्षिका अश्विनी पवार, शीतल नडगिरे, वैष्णवी सानप यांची उपस्थिती होती.
 यावेळी डॉ. एम. आर. पाटील म्हणाले, आपल्या पाल्याचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी त्याला सुरुवातीपासूनच स्वयंशिस्त, सुसंस्कारित बनवणे आवश्यक आहे. प्रत्येक विद्यार्थ्याला लहानपणापासूनच गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळणे गरजेचे आहे. त्याचबरोबर कौशल्यावर आधारित शिक्षणही मिळणे गरजेचे आहे. त्यातून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होण्यास मदत होते. विद्यार्थ्यांचा सर्वांगाने बौध्दिक विकास करण्यासाठी रॉयल एज्युकेशन सोसायटीतील सर्व शाळा व महाविद्यालयातील शिक्षक, कर्मचारी परिश्रम घेत आहेत, असे ते म्हणाले.

Post a Comment

أحدث أقدم