गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये विश्वविक्रम रचणारी सृष्टी जगतापचा व्ही. एस. पँथर्स च्या वतीने सत्कार संपन्न

गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये विश्वविक्रम रचणारी सृष्टी जगतापचा व्ही. एस. पँथर्स च्या वतीने सत्कार संपन्न
लातूर/ प्रतिनिधी- लातूर शहरातील व्ही.एस. पॅंथर्स युवा संघटनेच्या वतीने विश्वविक्रम रचणारी लातूर ची कन्या सृष्टी जगताप हिचा पालकामसमवेत सन्मानचिन्ह देऊन यथोचित सत्कार सं. अध्यक्ष विनोद खटके यांच्या हस्ते करण्यात आला. कु. सृष्टी सुधीरजी जगताप यांच्या घरी जाऊन वडील सुधीर व आईची भेट घेत कु. सृष्टी जगताप यांना सन्मान चिन्ह देऊन अभिनंदन करीत कु. सृष्टी जगताप यांनी केलेल्या कार्याचे कौतुक करुन पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
व्हि. एस. पँथर्स संस्थापक अध्यक्ष विनोद खटके यांनी बोलताना म्हणाले की,लातूरची कन्या नृत्यांगणा कु. सृष्टी सुधीर जगताप यांनी सलग १२७ तास नृत्याविष्कार सादर करुन एक नवा विश्वविक्रम केला असे मनोगत व्यक्त केले.यावेळी वृक्ष प्रेमी सुपर्ण जगताप संपर्क प्रमुख आनंद जाधव रवि कुरील, अजय सूर्यवंशी, महावीर कांबळे, हरीश आयतनबोने  आदी उपस्थित होते .

Post a Comment

أحدث أقدم