जवाहर नवोदय विद्यालयात प्रवेश परीक्षेचे 10 ऑगस्टपर्यंत ऑनलाईन अर्ज भरण्याचे आवाहन

जवाहर नवोदय विद्यालयात प्रवेश परीक्षेचे 10 ऑगस्टपर्यंत ऑनलाईन अर्ज भरण्याचे आवाहन

 लातूर: येथील जवाहन नवोदय विद्यालयामध्ये 2024-25 या शैक्षणिक वर्षात इयत्ता सहावीत प्रवेशासाठी ऑनलाईन प्रवेश अर्ज भरण्यास प्रारंभ झाला आहे. 10 ऑगस्ट 2023 पर्यंत www.navodaya.gov.in या संकेतस्थळावर निशुल्क ऑनलाईन अर्ज भरता येतील. प्रवेश परीक्षा 20 जानेवारी 2024 रोजी घेण्यात येणार आहे. शैक्षणिक वर्ष 2023-24 मध्ये इयत्ता पाचवीत लातूर जिल्ह्यातील मान्यता प्राप्त शाळेतून शिक्षण घेत असलेले आणि 1 मे 2012 ते 31 जुलै 2014 (दोन्ही दिवस धरुन) दरम्यान जन्मतारीख असणारे विद्यार्थी प्रवेश अर्ज भरण्यास पात्र असतील.

 ऑनलाईन प्रवेश अर्ज भरताना इयत्ता पाचवीमध्ये शिकत असलेले शाळेच्या मुख्याध्यापकांनी प्रमाणित केलेले प्रमाणपत्र, विद्यार्थ्यांचा फोटो, पालकांची व विद्यार्थ्यांची स्वाक्षरी, आधार माहिती तसेच सरकारी अधिकाऱ्यांनी प्रमाणीत केलेले रहिवाशी प्रमाणपत्र आदी जेपीजी फॉरमॅट मध्ये 10 ते 100 के बी साईजमध्ये अपलोड करण्यासाठी तयार ठेवणे आवश्यक आहे.

एकदा अर्ज भरल्यानंतर परीक्षेचे माध्यम, जन्मदिनांक, क्षेत्र (शहरी/ग्रामीण), प्रवर्ग (इतर मागास/ सामान्य/अनुसूचित जाती/दिव्यांग) यामध्ये बदल करता येत नसल्याने ऑनलाईन अर्जामध्ये माहिती काळजीपूर्वक भरावी. विद्यार्थी आणि पालकांचा रहिवास हा लातूर जिल्ह्यात असणे आवश्यक आहे.
प्रवेश परीक्षेतून निवड झाल्यानंतर प्रत्यक्ष प्रवेश घेताना विद्यार्थी व पालक लातूर जिल्ह्याचे रहिवासी असल्याचे तहसीलदार यांच्याकडून प्राप्त केलेले रहिवासी दाखला जमा करणे आवश्यक आहे. अधिक माहितीसाठी कार्यालयीन वेळेत लातूर जवाहर नवोदय विद्यालय येथील प्रवेश परीक्षेचे प्रभारी बी. डी. शेख (भ्रमणध्वनी क्र. 9817834930) किंवा व्ही. एच. खिलारे (भ्रमणध्वनी क्र. 9860568840) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन लातूर नवोदय विद्यालयाचे प्राचार्य पी. जे. डी. विल्यम यांनी केले आहे.

Post a Comment

أحدث أقدم