अमृता मगरने मिळवले पुनर्मूल्यांकनात 100 टक्के गुण कालिदास माने यांच्याकडून सत्कार

अमृता मगरने मिळवले पुनर्मूल्यांकनात 100 टक्के गुण कालिदास माने यांच्याकडून सत्कार                        
लातूर: येथील नंदादीप माध्यमिक विद्यालयात शैक्षणिक वर्ष 2022-23 मध्ये इयत्ता दहावी वर्गात शिकणाऱ्या कु. अमृता रामचंद्र मगर हिने इयत्ता दहावी बोर्ड परीक्षेत 99.60 टक्के गुण घेत विद्यालयातून सर्वप्रथम आली होती. यामध्ये विषय निहाय मराठी- 98, हिंदी-85, इंग्रजी -98, गणित-98,विज्ञान-100, सामाजिक शास्त्रे-94 असे एकूण 573 गुण मिळविले होते. यात बेस्ट ऑफ फाईव्ह च्या नियानुसार प्राप्त 
गुणातून सर्वात जास्त गुण असलेल्या 5 विषयात 487 गुण व लोककलेच्या माध्यमातून 10 गुण असे 497 गुण मिळाले होते. पण हिंदी व सामाजिक शास्त्रात अपेक्षित गुण न मिळाल्याने, हिंदी व सामाजिक शास्त्रातील उत्तर पत्रिकेच्या पुनर्मूल्यांकनासाठी अर्ज केला होता. यामध्ये वरील विषयाच्या उत्तरपत्रिकेची परत तपासणी केल्यानंतर हिंदी विषयात 03 गुण वाढून 88 तर सामाजिक शास्त्रात 04 गुण वाढून 98 गुण झाले.
बेस्ट ऑफ फाईव्ह च्या नियमानुसार 5 विषयात 500 पैकी 491 गुण व लोककलेचे 9 गुण असे 500 गुण मिळवत 100 टक्के गुण झाले आहेत. या वर्षीच्या शालांत प्रमाणपत्र परीक्षा-2023 च्या निकालात संपूर्ण महाराष्ट्रात 151 विद्यार्थ्यांनी 100 टक्के गुण मिळवले होते त्यापैक्की 108 विद्यार्थी हे लातूर विभागीय बोर्डातील होते तर वाढीव गुणासह अमृता मगर ही 109 वी विद्यार्थिनी ठरली आहे.
या यशाबद्दल संस्था सचिव कालिदास माने, प्रशासकीय अधिकारी जी. टी.माने व उषा आडे-राठोड, मुख्याध्यापक श्रीनिवास राऊत, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन केले आहेत..

Post a Comment

أحدث أقدم