वीर बॅक कंपनीतर्फे रामनाथ विद्यालयास आर ओ वॉटर प्लांट भेट

 वीर बॅक कंपनीतर्फे रामनाथ विद्यालयास आर ओ वॉटर प्लांट भेट
 आलमला-श्री रामनाथ विद्यालय आलमला येथे दिनांक 21 जुलै 2023 रोजी वीर बॅक कंपनीतर्फे विद्यालयास व व रामनाथ नगर परिसरातील ग्रामस्थास आर ओ वाटर प्लांट चा लोकार्पण सोहळा संपन्न झाला .या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रामनाथ शिक्षण संस्थेचे सचिव श्री प्रभाकर कापसे हे उपस्थित होते तर प्रमुख अतिथी म्हणून श्री जगदीश पाटील व श्री मुकेश जाधव एरिया बिझनेस मॅनेजर  विर बॅक कंपनी,पंचायत समितीचे  विस्तार अधिकारी श्री बालाजी तेलंग साहेब, कंपनीचे बिजनेस ऑफिसर श्री बाळासाहेब घोलप , कंपनीचे एरिया बिजनेस ऑफिसर श्री सहदेव माळी , अलमल्याचे मा.सरपंच श्री कैलास निलंगेकर , मा.उपसरपंच बाबू सिंग ठाकूर, ग्रामविकास अधिकारी श्री राठोड सिताराम, आस्था मेडिकलचे प्रो. प्रा श्री अमरीश निलंगेकर, श्री अहमद तांबोळी व्हा.चेअरमन, मू अ  अनिता पाटील उपस्थित होते. प्रथम या कार्यक्रमांमध्ये सर्व मान्यवरांचा फेटा, शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री कैलास निलंगेकर यांनी आलमला येथील केलेल्या विविध कार्यक्रमाचा थोडक्यात आढावा मांडला व या आरो प्लांट विषयी सहकार्य केलेल्या वीर बॅक कंपनीचे आणि रामनाथ शिक्षण संस्थेने प्लांट साठी दिलेल्या जागेबद्दल ग्रामस्था तर्फे आभार व्यक्त केले .श्री जगदीश पाटील व तेलंग साहेब यांनी आपल्या निरोगी शरीरासाठी शुद्ध पाण्याचे किती महत्त्व आहे हे विद्यार्थी व ग्रामस्थांना सांगितले. ही वीर बॅक ही फ्रान्स देशातील कंपनी असून 130 देशांमध्ये जनावरांच्या औषधांची निर्मिती व  विक्री करणारी अग्रेगन्य कंपनी असून या कंपनीने आपल्या सेस फंडातून दहा लाख रुपयांचा हा आरो प्लांट अलमला येथील रामनाथ नगर रामनाथ विद्यालयाच्या प्रांगणामध्ये बसवलेला असून या प्लांट साठी आस्था मेडिकल औसाचे श्री अमरीश निलंगेकर यांनी कंपनीकडे विनंती केली होती. व ग्रामपंचायतीने त्यासाठी योग्य पाठपुरावा करून या प्लांटची निर्मिती करण्यात आली त्याचे आज लोकार्पण करण्यात आले . अध्यक्षीय समारोप श्री प्रभाकर कापसे यांनी करून कंपनीचे आभार व्यक्त केले हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ग्रामपंचायत चे माजी सदस्य गुरुनाथ अंबुलगे, मुलानी रमजान. रामनाथ विद्यालयातील सर्व प्राध्यापक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले या कार्यक्रमासाठी गावातील  प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार रामनाथ विद्यालयाचे पर्यवेक्षक श्री पी सी पाटील सर यांनी केले.

Post a Comment

أحدث أقدم