इतर मागासवर्गीय युवक-युवतींना उद्योजक होण्यासाठी महामंडळाचा हात …!!

इतर मागासवर्गीय युवक-युवतींना उद्योजक होण्यासाठी महामंडळाचा हात …!!
 
महाराष्ट्र राज्य हे नेहमीच कल्याणकारी योजना सुरु करण्यात आणि त्या राबविण्यात अग्रेसर आहे. शेवटच्या माणसाचे कल्याण हे उद्देश ठेवून शासन काम करते. काही वर्षापूर्वी इतर मागासवर्गीय समाजाच्या उन्न्तीसाठी नवीन मंत्रालय सुरु केले, महामंडळही सुरु केले. त्या महामंडळाच्या वतीने युवक-युवतींना व्यवसायीक, उद्योजक होण्यासाठी प्रोत्साहन देण्यासाठी योजना सुरु केल्या. त्या सर्व सामान्यांना कळाव्यात म्हणून म्हणून ही माहिती देत आहेात. …!!
*बीजभांडवल योजना*
बीजभांडवल योजना राष्ट्रीयकृत बॅंका व जिल्हा मध्यवर्ती बॅंकांच्या माध्यमातुन राबवीण्यात येते. यात महामंडळाचे कर्ज 20 टक्के बॅंकेचे कर्ज 75 टक्के व लाभार्थीचा सहभाग 5 टक्के असतो. कर्ज सहभागांची रक्कम बॅकेने एकुण मंजुर केलेल्या कर्ज रकमेवर असते. कर्ज रक्कम मर्यादा रु.5 लक्ष. कर्ज फेडीची कालमर्यादा 5 वर्षे. व्याजदर महामंडळाच्या सहभाग रकमेवर 6 टक्के व बॅंकेच्या सहभाग रकमेवर प्रचलीत बॅंक व्याज दरानुसार. कुटुंबाची वार्षीक उत्पन्न मर्यादा रु. 1 लक्ष पर्यंत. अर्जदाराचे वय 18 ते 50 वर्षे. 
*थेट कर्ज योजना*
थेट कर्ज योजना महामंडळामार्फत राबवण्यात येते. कर्ज मर्यादा रु. 1 लक्ष. अर्जदाराचा सिबील स्कोअर किमान 500 इतका असावा. वय 18 ते 55 वर्षे. परत पफेडीचा कालावधी 4 वर्षे. नियीमत कर्ज परतपफेड करणाऱ्या लाभार्थींना व्याज आकारले जाणार नाही . (हप्ता मासीक रु.2085) तथापी थकीत कर्ज रकमेवर 4 टक्के व्याज आकारण्यात येते. कुटुंबाची वार्षीक उत्पन्न मर्यादा रु. 1 लक्ष पर्यंत.
*वैयक्तीक कर्ज व्याज परतावा योजना*
 सदर योजना बॅंके मापर्फत राबवीण्यात येते. कर्ज मर्यादा रु.10 लक्ष. महामंडळाच्या वेबपोर्टल / संगणक प्रणालीवर नोंदणी अनिवार्य. कुटुंबाची वार्षीक उत्पन्न मर्यादा रु.8 लक्ष पर्यंत. कर्ज परतपफेडीचा कालावधी बॅंक निकषानुसार. कर्ज रकमेचे हप्ते नियमित भरल्यास व्याज परतावा रक्कम महामंडळ नियमानुसार लाभार्थीच्या आधार लिंक खात्यात दरमहा जमा करण्यात येईल. पात्र लाभार्थीस एल.ओ.आय.(Letter Of Intent) दिले जाईल. त्याआधारे बँकेकडून कर्ज मंजूर करुन घ्यावे लागेल. 
*गट व्याज परतावा योजना*
गट व्याज परतावा योजना बॅंकेमार्फत राबविण्यात येते. महामंडळाच्या निकषानुसार विहीत केलेल्या वार्षिक उत्पन्न मर्यादेतील बचतगट भागीदारी / सहकारी संस्था शासन प्रमाणीत. कर्ज मर्यादा रु.10 लक्ष ते 50 लक्ष. महामंडळाच्या वेबपोर्टल / संगणक प्रणालीवर नोंदणी अनिवार्य. गटातील सर्व लाभार्थींचे खाते आधार लिंक असणे अनिवार्य. गटातील लाभार्थीचे वय 18 ते 45 वर्षे. गटातील भागीदारांचे खाते किमान रु. 500 कोटींच्यावर ठेवी असलेल्या व कोअर बॅंकींग सिस्टीम असलेल्या राष्ट्रीयकृत / शेड्युल्ड बॅंकेत खाते असावे. गटातील सदस्यांनी यापुर्वी महामंडळाच्या वा इतर महामंडळाच्या कोणत्याही योजनांचा लाभ घेतलेला नसावा. गटातील सर्व सदस्यांचा सिबील स्कोअर किमान 500 असावा. कर्ज परतफेडीचा कालावधी 5 वर्षे वा कर्ज कालावधी यापैकी जो कालावधी कमी असेल तो. कर्ज रकमेचे हप्ते नियमित भरल्यास व्याज परतावा रक्कम महामंडळ नियमानुसार लाभार्थीच्या आधार लिंक खात्यात दरमहा जमा करण्यात येईल. पात्र गटास एल.ओ.आय. दिले जाईल. त्या आधारे बॅंकेकडुन कर्ज मंजुर करुन घ्यावे लागेल.
*शैक्षणिक कर्ज व्याज परतावा योजना*
शैक्षणीक कर्ज व्याज परतावा योजना बॅंकेमापर्फत राबवण्यात येते. बॅंक कर्ज रकमेवरील व्याज परतावा. देशांतर्गत व परदेशी उच्च शिक्षणासाठी रु.10 लक्ष व 20 लक्ष पर्यंत अनुक्रमे. विद्यार्थीचे वय 17 ते 30 वर्षे. अर्जदाराची कौटुंबीक वार्षीक उत्पन्न मर्यादा रु.8 लक्ष. अर्जदार 12 वी 60 टक्के गुणांसह उत्तीर्ण असावा. देशांतर्गत अभ्यासक्रम: आरोग्य विज्ञान, अभियांत्रिकी, व्यावसायीक व व्यवस्थापन, कृषी, अन्नप्रक्रीया व पशुविज्ञान, परदेशी अभ्यासक्रम: आरोग्य विज्ञान, अभियांत्रिकी, व्यावसायीक व व्यवस्थापन बॅंकेने उपलब्ध करुन दिलेल्या कर्जामध्ये फक्त शैक्षणीक शुल्क, पुस्तके व साहीत्य खरेदीचा सामावेश राहील. परदेशी अभ्यासक्रमांसाठी QS(Quacquarelli Symonds) रॅकींग / गुणवत्ता निकषांनुसार संस्थेचे स्थान 200 पेक्षा आतील. परदेशी अभ्यासक्रमाकरीता पात्र परिक्षा GRE (Graduate Record), TOEFL (Test of English as Foreign Language) परीक्षा उत्तीर्ण.
*पात्रतेचे निकष*
लाभार्थी महाराष्ट्र राज्याचा इतर मागासवर्गीय रहीवासी असावा. तो महामंडळाचा, बॅंकेचा अथवा कोणत्याही वित्तीय संस्थेचा थकबाकीदार नसावा. कुटुंबातील एकाच व्यक्तीस योजनेचा लाभ घेता येईल. अर्जदाराने जो व्यवसाय निवडला असेल त्याचे त्याला ज्ञान किंवा अनुभव असावा. कर्जाच्या अटी व शर्ती महामंडळ ठरवेल त्याप्रमाणे रहातील.
*अर्जासोबत जोडवयाच्या कागदपत्रांचा तपशिल*
उत्पन्नाच्या दाखल्यासोबत सक्षम अधिकाऱ्याने अर्जदार प्रगत गटात मोडत नसल्याबाबतच्या प्रमाणपत्रांच्या साक्षांकीत प्रती. जातीचे प्रमाणपत्र, शिधापत्रिकेची प्रमाणीत प्रत, आधारकार्ड, पासपोर्ट साईज फोटो. व्यवसाय स्थळाची भाडेपावती, करारनामा, सातबारा, उतारा, लाईट बील प्रत. शैक्षणीक अर्हतेचे प्रमाणपत्र, जन्मतारखेचा दाखला. दोन जामिनदारांचे हमीपत्र अथवा गहाणखत. स्थानिक स्वराज्य संस्थेचे व्यवसाय करण्याबाबत ’ना हरकत प्रमाणपत्र तसेच ज्या प्रयोजनासाठी कर्ज मंजुर होणार आहे त्या प्रयोजनासाठी त्याचा उपयोग करण्याबाबतचे प्रतिज्ञापत्र. तांत्रिक व्यावसायाकरिता आवश्यक असतील असे परवाने/ लायसन्स. व्यवसायाचा प्रकल्प अहवाल, लागणारा कच्चा माल, यंत्र सामुग्री इत्यादींचे दरपत्रक. महामंडळाने वेळोवेळी निर्देशीत केलेल्या कागदपत्रांचा तपशील.
महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळ महामंडळाच्या इतर मागास प्रवर्गातील सुशिक्षीत व बेरोजगारासाठी कृषी, व्यापार व उद्योग सुरु करण्यासाठी खालील प्रमाणे कर्ज योजना राबविल्या जातात. योजनांच्या अधिक माहिती व इतर तपशीलासाठी महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित आणि विकास महामंडळ म. पहिला मजला, जात पडताळणी इमारत, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, शिवनेरी गेट समोर, गुळ मार्केट, लातुर या कार्यालयाशी कार्यालयीन वेळेत संपर्क साधावा, असे महाराष्ट्र राज्य इतर मागसवर्गीय वित्त आणि विकास महामंडळ लि. लातूरचे जिल्हा व्यवस्थापक पी.सी. पोहरे यांनी आवाहन केले आहे. 
*कौशल्य विकास प्रशिक्षण योजना*
राज्यातील इतर मागासवर्गीय समाजातील परंपरागत व्यवसायाचे आधुनिकीकरण झालेले असल्यामुळे त्या परंपरागत व्यवसायात कार्यरत असलेल्या तसेच इतर शैक्षणिक पात्रता धारण केलेल्या इतर मागासवर्गीय समाजातील पात्र व्यक्तींना आधुनिक प्रशिक्षणाचा लाभ व्हावा तसेच कौशल्य विकास प्रशिक्षण प्रदान करुन त्यांना कौशल्यपुर्ण बनविणे व त्याव्दारे रोजगार किंवा स्वयंरोजगार उपलब्ध करुन देणे.
वयोमर्यादा 18 ते 50 वर्षे. शिक्षण 10 वी उत्तीर्ण. महामंडळाच्या MSSDS च्या वेबपोर्टलवर उमेदवाराने नांव नोंदणी करणे अनिवार्य आहे. इतर मागासवर्गीय प्रवर्गाचे जात प्रमाणपत्र, एकत्र कुटुंबाचे उत्पन्न प्रमाणपत्र (8 लक्ष पर्यंत) वयाचा दाखला, रहिवासी दाखला, आधार कार्ड अपलोड करावे लागेल. बाजारपेठेत उपलब्ध असलेल्या सेवा, नोकऱ्यांची मागणी विचारात घेऊन प्रशिक्षण अभ्यासक्रम महामंडळामार्फत निवडण्यात येईल. महामंडळाने निवड केलेल्या अभ्यासक्रमातुन उमेदवारास त्याच्या कल चाचणीच्या आधाराव अभ्यासक्रमाची निवड करता येईल. स्किल इंडीया पोर्टलवर नोंदणी केलेल्या प्रशिक्षण संस्थेमार्फत प्रशिक्षण देण्यात येईल. संपुर्ण प्रशिक्षण महामंडळामार्फत देण्यात येईल. प्रशिक्षणादरम्यान दैनंदिन हजेरी अनिवार्य राहील.
                                           

Post a Comment

أحدث أقدم