एमआयडीसी येथे ५ एमव्हीए क्षमतेचे अतिरिक्त रोहित्र बसविण्यास मंजुरी

एमआयडीसी येथे ५ एमव्हीए क्षमतेचे अतिरिक्त रोहित्र बसविण्यास मंजुरी

औसा - आमदार अभिमन्यू पवार यांच्या पाठपुराव्यामुळे सर्वसाधारण जिल्हा वार्षिक योजना २०२३-२४ अंतर्गत १ कोटी ९१ लक्ष रुपयांच्या निधीसह औसा एमआयडीसी उपकेंद्र येथे ५ एमव्हीए क्षमतेचे अतिरिक्त रोहित्र बसवून उपकेंद्राची क्षमतावाढ करण्यास मंजुरी मिळाली आहे. यामुळे जुन्या उद्योगांना योग्य दाबाने विद्युत पुरवठा करण्यासह नव्या उद्योगांना वीजजोडणी देणं शक्य होणार आहे. 

            काही दिवसांपूर्वी औसा एमआयडीसीमधील उद्योजकांच्या शिष्टमंडळाने आमदार अभिमन्यू पवार यांची भेट घेऊन औसा एमआयडीसी विद्युत उपकेंद्रातून कमी दाबाने विद्युत पुरवठा होत असल्याची आणि त्याचा उद्योगांवर विपरीत परिणाम होत असल्याची बाब आ. अभिमन्यू पवार यांच्या निदर्शनास आणून दिली होती. त्यानंतर १२ जून रोजी पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत आ. अभिमन्यू पवार यांनी हा मुद्दा उपस्थित करून औसा एमआयडीसी येथे ५ एमव्हीए क्षमतेचे अतिरिक्त रोहित्र बसविण्यात यावे अशी मागणी केली होती. पालकमंत्री गिरीश महाजन यांनी यासंदर्भात योग्य ती कार्यवाही करण्याच्या सूचना जिल्हा प्रशासनाला दिल्या होत्या.त्यानूसार 

            सर्वसाधारण जिल्हा वार्षिक योजना २०२३-२४ अंतर्गत १ कोटी ९१ लक्ष रुपयांच्या निधीसह औसा एमआयडीसी उपकेंद्र येथे ५ एमव्हीए क्षमतेचे अतिरिक्त रोहित्र बसवून उपकेंद्राची क्षमतावाढ करण्यास मंजुरी मिळाली आहे.औसा येथील औद्योगिक वसाहत विकासासाठी आ. अभिमन्यू पवार यांचे सातत्याने प्रयत्न सुरू असून त्यांच्या माध्यमातून येथील औद्योगिकीकरण ला चालना मिळत आहे.सदरील कामासाठी निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल आ. अभिमन्यू पवार यांनी पालकमंत्री गिरीश महाजन यांचे आभार मानले आहेत. 

Post a Comment

أحدث أقدم