महापुरुषांचे विचार व सामाजिक सलोखा जपण्याची गरज- युवा व्याख्याते जगदीश ओहोळ

महापुरुषांचे विचार व सामाजिक सलोखा जपण्याची गरज- युवा व्याख्याते जगदीश ओहोळ
औसा/ प्रतिनिधी -धर्म म्हणजे अनेक जाती पंताना स्वतः मध्ये सामावून घेऊन त्यांना योग्य शिकवण देणारा विचार म्हणजे धर्म होय. विचार हा धर्माचा खरा आरसा असून तो आरसाच आज मलीन होत चालला आहे. तो स्वच्छ करून समाजाला धर्माबद्दल जागरुक करण्याचे काम साहित्यिकांनी करावे असे मत युवा व्याख्याते व आंतरराष्ट्रीय ख्यातीचे इतिहास संशोधक माननीय योगेश पाटील सर यांनी व्यक्त केले. 
पुण्यातील वाकड येथील अव्हेन्यू कल्चरल च्या सभागृहातील
साहित्य सारथी कला मंच च्या पुणे शाखेच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. 
साहित्य सारथी कला मंच ही साहित्यिक संस्था मागील पाच वर्षापासून लातूर जिल्ह्यात कार्यरत असून पुणे येथे या साहित्यिक संस्थेची दुसरी शाखा सुरू करण्यात आली. 
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सुप्रसिद्ध युवा व्याख्याते जगदीश ओहोळ तर प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध गझलकार अरुण कटारे हे उपस्थित होते. 
साहित्य सारथी कला मंच ही साहित्यिक संस्था संपूर्ण महाराष्ट्रभर साहित्य चळवळ उभी करण्यात अग्रेसर राहील असे मत संस्थापक अध्यक्ष *श्री सुरेश धोत्रे* यांनी व्यक्त केले. 
साहित्य सारथी कला मंच च्या आस्थापन मंडळाच्या या कार्यक्रमात संस्थेच्या अध्यक्षपदी *डॉ.प्रशांत पाटोळे* तर उपाध्यक्ष पदावर कवी व अभिनेते *पांडुरंग म्हस्के* यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. 
संस्थेचे कार्याध्यक्ष म्हणून *कवी दिनेश कांबळे* कोषाध्यक्ष पदावर *कवी तानाजी शिंदे,सचिवपदी प्रा. *दिलीप वाघमारे* तर सहसचिव म्हणून *सागर वाघमारे*
तसेच संस्थेचे सल्लागार म्हणून ॲड. उमाकांत आदमाने यांची निवड करण्यात आली. 
अध्यक्षांच्या वतीने त्यांना निवड पत्र देऊन गौरवण्यात आले. या नियोजित कार्यक्रमाचे बहारदार सुत्रसंचालन प्रा. विजय अंधारे रानकवी जगदीप वनशिव यांनी केले कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थापक अध्यक्ष सुरेश धोत्रे यांनी केले तर आभार पुणे शाखेचे अध्यक्ष डॉ. प्रशांत पाटोळे यांनी मानले. या कार्यक्रमासाठी समीर किशोर सर , डॉ सुनील उगीले सर, दिलीप वाघमारे ,दिनेश कांबळे यांनी परीश्रम घेतले

Post a Comment

أحدث أقدم