रेनिसन्स सीबीएसई स्कूलमध्ये करिअर मार्गदर्शन कार्यक्रम


रेनिसन्स सीबीएसई स्कूलमध्ये करिअर मार्गदर्शन कार्यक्रम
      लातूर/प्रतिनिधी: इयत्ता आठवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी रेनिसन्स इंटरनॅशनल सीबीएसई स्कूलमध्ये करिअर मार्गदर्शन कार्यक्रम घेण्यात आला होता.
    या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून डॉ.लड्डास् मेडिकल क्लासेसचे संचालक डॉ.विनोद लड्डा यांच्यासह सहसंचालिका डॉ.सौ.अर्चना लड्डा,
अभिषेक लड्डा यांची उपस्थिती होती. 
       यावेळी मार्गदर्शन करताना अभिषेक लड्डा यांनी सध्याच्या परिस्थितीत आपण कशाप्रकारे आपल्या क्षेत्रात यशस्वी होऊ शकतो?त्यासाठी कशी तयारी करावी ? नीट परीक्षा आणि त्याची तयारी कशी करावी ? याबाबत माहिती दिली.
त्यासोबतच योग,ध्यान, आहार आणि वातावरण कसे महत्वाचे असते याविषयी मार्गदर्शन केले. 
    प्रमुख मार्गदर्शक डॉ. विनोद लड्डा यांनी करियरच्या संधी कशा असतात,त्यासाठी पालक म्हणून आपण काय करावे ? यश म्हणजे काय ?अभ्यासाचे नियोजन कसे करावे ? आपले भविष्य कसे घडवावे ? याची माहिती दिली.केवळ पुस्तक आणि शिक्षक याव्यतिरिक्त माहिती तंत्रज्ञानाच्या विविध माध्यमातून आपण शिक्षण कसे घ्यावे ? याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. 
    डॉ. अर्चना लड्डा यांनीही सर्व माता- पालकांना आपल्या मुलाच्या आयुष्यात आणि करिअर मध्ये एका आईचे किती आणि कसे महत्व असते याबाबत विचार मांडले.मुलांना चांगल्या सवयी कशा लावाव्यात, छोट्या गोष्टीतून मुलांचे करिअर कसे घडते ?आदी विषयावर त्यांनी मार्गदर्शन केले. 
   प्राचार्य महेश बांगर यांनी डॉ.लड्डा आणि परिवाराच्या समाजोपयोगी कार्याची ओळख करून दिली.अभिषेक यांच्या मेहनतीचे कौतुक करून भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.
   प्रारंभी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सरस्वती माता आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले.उपस्थित मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. 
    शाळेच्या उपप्राचार्या सौ.अनुराधा कुलकर्णी यांनी कार्यक्रमाचे स्वरूप सांगून मान्यवरांचे स्वागत केले. 
 कार्यक्रमाची सांगता कल्याण मंत्राने करण्यात आली.कार्यक्रमाचे सूत्रसंचलन सौ.सोनाली दर्डा यांनी केले तर प्राचार्य बांगर यांनी आभार मानले.

Post a Comment

أحدث أقدم