रोटरीच्या रक्तदान शिबिरास उस्फूर्त प्रतिसाद

 रोटरीच्या रक्तदान शिबिरास उस्फूर्त प्रतिसाद


    लातूर/प्रतिनिधी:रोटरी क्लब ऑफ लातूर मिडटाऊन,रोट्रॅक्ट क्लब ऑफ लातूर मिडटाऊन व लातूर अजिंकॅन्स यांच्या संयुक्त विद्यमाने डॉक्टर्स डे,सीए डे व कृषी दिवसानिमित्त आयोजित रक्तदान शिबिरास उस्फुर्त प्रतिसाद मिळाला.यावेळी एकूण ३५ रक्तपिशव्यांचे संकलन करण्यात आले.
  राजस्थान शाळेच्या पाठीमागे डॉ.राजगोपाल तापडिया यांच्या श्रीजी आयुर्वेद अँड पंचकर्म सेंटर येथे सकाळी १० ते दुपारी १ या कालावधीत हे शिबीर संपन्न झाले.या शिबिरात रोटरीचे पदाधिकारी व युवक-
युवतींनी मोठ्या संख्येने रक्तदान केले.हे शिबीर यशस्वी करण्यासाठी रोटरी क्लब ऑफ लातूर मिडटाऊनचे अध्यक्ष रवींद्र बनकर, सचिव डॉ.
अविनाश भोसले व किशोर दाताळ,डॉ.
श्रीनिवास भंडे,कोषाध्यक्ष वीरेंद्र फुंडीपल्ले,अमोल दाडगे,नियोजित अध्यक्ष  चेतन पंढरीकर,रक्तदान शिबीर प्रकल्प प्रमुख प्रमोद कुंभार व समुदाय सेवा संचालक मोतीलाल वर्मा यांच्यासह रोटरीच्या सर्व सदस्यांनी सहकार्य केले.

Post a Comment

أحدث أقدم