योगासनांचे महत्व

योगासनांचे महत्व

कोरोनाने हाहाकार माजवला 
हवालदिल माणूस झाला 
ऑक्सिजन कमी पडला 
माणूस मृत्यूमुखी पडू लागला 

वयोवृद्ध,तरुण देखील
आजाराने त्रस्त झाला
सर्दी खोकल्या झाला तरी 
भयंकर टेंशन घेऊ लागला 

कधी तपासू लागला घसा 
तर कधी तपासू लागला रक्त
म्हणून प्राणायाम योगासने करा 
नक्कीच व्हाल रोग मुक्त....!!!

तुम्ही योगासने नाही करणार 
तर तरुणपणीच.........  
हे दुखत ते दुखत म्हणून
सतत रात्रंदिवस रडणार

चाळिशी झाली की...
म्हातार्‍या सारखे दिसणार 
जेवण कमी करणार अन 
गोळ्या जास्त खाणार

पन्नाशीतच गुढघ्याच्या
वाट्या बोलू लागणार 
चालण्यासाठी काठीचा  
आधार घ्यावा लागणार

योगासने प्राणायाम करा
होईल शरीराची हालचाल 
मानेला अन कमरेला 
नाही पट्टा लागणार......!!!

नित्य नियमित प्राणायाम मुळे 
चेहेरा तेजस्वी टवटवीत दिसेल 
वयोवृद्ध देखील हसेल अन 
प्रसन्न हसतमुख तरुण दिसेल

योगासने प्राणायाम मुळे 
शरीराची शुद्धी( servicing)  होते 
छातीतील जळजळ अन 
Acidity पळून जाते.....!!!

दुखत दुखत करणार्‍या जवळ 
कुणीही थांबत नसत......!!!
आजारी रोगट माणसाला 
कुणीही बोलत नसत.......!!!
 
नित्य योगासने केल्या मुळे 
शरीर अन मन बळकट बनत
नियमित प्राणायाम केल्या मुळे 
चेहर्‍याच सौंदर्य वाढत.......!!!
@ सौ.निर्मला के.शिंदे-पाटील 
     लेखिका कवयित्री

Post a Comment

أحدث أقدم