शिवभक्तांची इष्टलिंग महापूजा शिव दिक्षेने हिरेमठ संस्थांनच्या उत्सवाची सांगता

 शिवभक्तांची इष्टलिंग महापूजा शिव दिक्षेने हिरेमठ संस्थांनच्या उत्सवाची सांगता
  औसा प्रतिनिधी :-हिरेमठ संस्थानचे  गुरु निरंजन शिवाचार्य महाराज यांनी आठ दशकापूर्वी वीरशैव लिंगायत समाजाच्या शिष्यगणासाठी इष्टलिंग महापूजा वार्षिक महोत्सव आणि शिव दीक्षा सोहळ्याची परंपरा सुरू केली होती. संस्थांनचे मार्गदर्शक डॉ. शांतिवीरलिंग शिवाचार्य महाराज यांनी ही परंपरा कायम राखत आता संस्थांनचे पिठाधिपती बाल तपस्वी निरंजन शिवाचार्य महाराज यांच्याकडे सोपविली आहे. धर्म जागृतीतून धर्माची शिकवण देण्यासाठी उज्जैन पिठाचे श्रीमद जगद्गुरु डॉ. सिद्धलिंग राजवेशी केंद्र महास्वामीजी यांच्या दिव्य सानिध्यामध्ये दिनांक 13 जुलै रोजी हजारो शिवभक्तांनी इष्टलिंग महापूजा व शिवदीक्षा सोहळ्यामध्ये सहभाग घेतला. अखंड शिवनाम सप्ताह कालावधीमध्ये श्री अमृतेश्वर शिवाचार्य महाराज जिंतूर यांची संगीतमय शिवकथा कार्यक्रमात श्रुती मंत्रमुग्ध झाले होते.
     श्रीमद जगद्गुरु उज्जैनपीठ यांनी दोन दिवस आपल्या अमृतवाणीतून आशीर्वाचन देऊन धर्मोपदेश केला आणि सर्व प्राणीमात्राच्या कल्याणासाठी भरपूर पाऊस पडावा आणि समृद्धी निर्माण व्हावी अशी परमेश्वराकडे मागणी केली. शांततामय समाज निर्मितीसाठी सत्याच्या मार्गावरून चालत धर्माचे पालन करणे गरजेचे आहे. असा उपदेशही त्यांनी धर्मसभेत दिला. हिरेमठ संस्थांनच्या शिष्य जनाच्या सहकार्याने आषाढ मासी वार्षिक महोत्सव आणि शिव दीक्षा सोहळ्यानिमित्त आयोजित धार्मिक कार्यक्रमाने संस्थांनचा परिसर फुलून गेला होता. हजारो शिवभक्तांनी इस्टलिंग महापूजा करून सुदिक्षा आणि महाप्रसादाचा लाभ घेतला वार्षिक महोत्सवाच्या यशस्वीतेसाठी वीरशैव समाजाचे अध्यक्ष सुभाषप्पा मुक्ता, उपाध्यक्ष विजयकुमार मिटकरी नागेश इळेकर, सचिन उटगे,वैजनाथ शिंदे, वेदमूर्ती चंद्रशेखर हिरेमठ यांच्यासह वीरशैव युवक संघटनेच्या कार्यकर्त्यांनी अथक परिश्रम घेतले.

Post a Comment

أحدث أقدم