अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकर्‍यांच्या शेतात जावून तात्काळ पंचनामे करा :- अभिजित कुडे

अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकर्‍यांच्या शेतात जावून तात्काळ पंचनामे करा :- अभिजित कुडे 
वरोरा:- तालुक्यातील सर्व गावात अतिवृष्टीमुळे शेतकर्‍यांच्या शेतात अतोनात नुकसान झाले आहे.  नाल्या जवळील शेती पूर्ण खरडून गेली आहे.  शेतकरी संकटात सापडला आहे.  शेतीचे पंचनामे करा असा आदेश तहसीलदार साहेब, गट विकास अधिकारी, तालुका कृषी अधिकारी साहेब यांनी 19 /7 ला दिले असून संबंधित अधिकारी अजून शेताच्या बांधावर पोहचले नाही कुठे कुठे पटवारी, कृषी सहाय्यक, ग्राम सेवक यांनी पंचनामे केले नाही. आधीच्या  4/7 ला झालेल्या  पुरात देखील  अनेक शेतकर्‍यांच नुकसान झाले होते त्यांचे देखील अजून पंचनामे झाले नाही.  तसे निवेदन दिले असून त्या संबंधित अधिकारी यांनी तात्काळ पंचनामे करावे अशी मागणी  नायब तहसीलदार,  कृषी अधिकारी पंचायत समिती याना केली आहे.  पटवारी,  कृषी सहाय्यक,  ग्राम सेवक  यांच्या मध्ये आपआपसात सामंजस्य  साधून पंचनामे करावे.  अधिकारी एकमेकांवर ढकलाढकली करत आहे.  संबंधित अधिकारी यांना कृषी अधिकारी धात्रक साहेब यांनी कॉल करुन सूचना दिल्या.  शेतकर्‍यांच्या शेतात जावून तात्काळ पंचनामे करावे अशी मागणी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे कार्यकर्ते अभिजित कुडे यांनी केली आहे.. वरोरा भद्रावती विधानसभा प्रमुख रविन्द्र भाऊ शिंदे  व तालुका प्रमुख दत्ता भाऊ बोरेकर यांच्या मार्गदर्शनाखाली शेतकर्‍यांच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी  चर्चा केली.

Post a Comment

أحدث أقدم