लातूर शहरास FM/आकाशवाणी केंद्र होणे गरजेचे – खा.सुधाकर शृंगारे

लातूर शहरास FM/आकाशवाणी केंद्र होणे गरजेचे – खा.सुधाकर शृंगारे


अनेक वर्षापासून आकाशवाणी केंद्राच्या प्रलंबित प्रश्नासाठी खासदार शृंगारे यांनी केंद्रीय माहिती व प्रसारण तथा क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर यांची घेतली भेट.


लातूरच्या आकाशवाणी केंद्रासाठी खासदार सुधाकर शृंगारे यांच्या सातत्याने प्रयत्न

 

शैक्षणिक आणि औद्योगीक दृष्ट्या अतिशय पुढारलेल्या असलेल्या लातूर शहरात अद्यापही FM/आकाशवाणी केंद्र नसून शहरामध्ये आकाशवाणी केंद्र होणे काळाची गरज असल्याचे सांगून शहरासाठी तत्काळ आकाशवाणी केंद्र मंजूर करण्याची मागणी खासदार सुधाकर शृंगारे यांनी केंद्रीय माहित व प्रसारण तथा क्रीडा मंत्री मा.ना.श्री.अनुराग जी ठाकूर यांना केली. गेल्या अनेक वर्षापासून शासन स्तरावर लातूर साठीच्या आकाशवाणी केंद्राचा प्रश्न प्रलंबित आहे. गेल्या 2 वर्षापूर्वी पूर्ण देशभरामध्ये एकूण 100 शहरामध्ये नवीन आकाशवाणी केंद्र स्थापन करण्यास केंद्र सरकारने मंजुरी दिली ज्यामध्ये 8 शहरे ही महाराष्ट्रातील होती. मात्र या 8 शहरामध्ये देखील लातूर शहराचा समावेश नसल्याचे सांगून २०२४ च्या लोकसभेपूर्वी लातूर शहरासाठी FM/आकाशवाणी केंद्र मंजूर करण्याबाबत देखील खासदार सुधाकर शृंगारे यांनी केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्री श्री.अनुराग जी ठाकूर यांना विनंती केली.

 

संपूर्ण देशभरासह राज्यभरामध्ये लातूर हे शिक्षणाचे आणि उद्योगाचे माहेरघर म्हणून आज नावारूपास येत आहे. शिक्षणाच्या माध्यमातून लातूर शहराचा झपाट्याने विस्तार होत आहे. स्पर्धा परीक्षा, Neet, Je, Engineering यांसारख्या शैक्षणिक शाखांचे अनेक नामांकित कोचिंग क्लास लातूर शहरामध्ये असल्यामुळे संपूर्ण देशभरामधून लातूर शहारात विद्यार्थी येत असतात. आकाशवाणी केंद्राच्या माध्यमातून त्या विद्यार्थ्यांसह त्यांच्या सोबत आलेल्या त्यांच्या पालकांना सुद्धा एक शैक्षणिक आणि मनोरंजनाचे साधन उपलब्ध होणार असल्याचे नमूद करून येणाऱ्या काळात लातूर ला तत्काळ FM/आकाशवाणी केंद्र मंजूर करण्याबाबतची मागणी खासदार सुधाकर शृंगारे यांनी केंद्रीय माहिती व प्रसारण तथा क्रीडा मंत्री श्री.अनुराग जी ठाकूर यांच्याकडे केली.

Post a Comment

أحدث أقدم