लातूर/प्रतिनिधी-
कृषि महाविद्यालय डोंगरशेळकी तांडा, ता. उदगीर, जि. लातूर येथील विद्यार्थिनी ग्रामीण कृषि जागरुकता कार्यानुभव आणि कृषि औद्योगिक संलग्नता. 2023-2024 या शैक्षणिक उपक्रमांच्या कृषिदुतांनी आयोजित शेतक-यांना सोयाबीन पिकामधील युरिया खताचा वापर करणे टाळावा असे संकेत दिले. सध्या परिस्थिती लक्षात घेता लातूर जिल्ह्यामध्ये खरीप व हंगामा मधील बहुतांश भागात सोयाबीन या पिकाची लागवड भरपूर प्रमाणामध्ये केलीली आहे. सोयाबीन पिकाची लागवड करून 30 ते 35 दिवसाचा कालावधी झालेला आहे.
मागील आठवड्यामध्ये गेल्या काही दिवसापूर्वी सततच्या पावसामुळे शेतामध्ये पाऊस साचून राहिल्यामुळे त्यांचे विपरीत परिणाम हे सोयाबीन पिकाची वाढ न होने व झाडाची पाने पिवळी पडणे यासारख्या समस्या शेती शिवारामध्ये दिसत आहे. तरीही या समस्यावरील उपाय हा युरिया खताचा वापर न करणे असुनसुद्धा शेतीशिवारामध्ये शेतकरी झाडाची योग्य वाढ होण्यासाठी असंतुलित खताचा वापर करत आहेत. तरी ही उपाययोजना शास्त्रज्ञांच्या दुष्टीकोणानुसार अयोग्य असल्याचे सांगितले.
कृषिदूतानी त्यांना पिकाच्या योग्य वाढीसाठी 19:19:19 या विद्राव्य खताचा वापर करण्यासाठी सांगितले आणि पिकातील कोवळ्या पानावरील पिवळसरपणा जाणवल्यास दुसऱ्या फवारणी मध्ये (0.5%) फेरस सल्फेट या सूक्ष्म अन्नद्रव्यांचा वापर करण्यास सीगितले.
अयोग्य पद्धतीचा वापर करत असताना शेतकरी कृषिदुतांच्या निर्देषणास आले व योग्य त्या पद्धतीचा अवलंब व मार्गक्रमण करण्यास सांगितले.अशा पद्धतीचा अवलंब केल्यास आपणास शेतीचा व पर्यावरणाचा आरोग्य दिर्घाकाल टिकवण्यास मदत होईल असे कृषिदुतांनी सांगितले. या कार्यक्रमासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॅा.आंगदराव सुर्यवंशी,कार्यक्रम समन्वयक डॉ. दिपाली कोकाटे व कार्यक्रम अधिकारी डॉ. प्रशांत राठोड प्रा.नवनाथ राठोड विषयक तज्ञ यांच्या मार्गदर्शनास्तव कृषिदुतांनी मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाचे आयोजन अनिकेत चामले, प्रथमेश देशमाने,दिग्विजय चव्हाण,निखिल चव्हाण,जयराज देशमुख,पृथ्वीराज देशमुख,किरण बोये,प्रताप बिरादार,व कृष्णा दळवे या कृषीदितांनी केले.
إرسال تعليق