राजा नारायणलाल लाहोटी स्कूलमध्ये संस्कृत दिन उत्साहात साजरा

 राजा नारायणलाल लाहोटी स्कूलमध्ये संस्कृत दिन उत्साहात साजरा


लातूर-येथील राजा नारायणलाल लाहोटी इंग्लिश स्कूलमध्ये संस्कृत दिन उत्साहात साजरा करण्यात आला.

जगभरातील संस्कृतप्रेमी दरवर्षी श्रावण शुद्ध पौर्णिमेला  संस्कृत दिन साजरा करतातशाळेच्या संस्कृत विभागाने सुद्धा राजा नारायणलाल लाहोटी इंग्लिश विद्यालयात 21-08-2023 ते 28-08-23 या कालावधीत संस्कृत सप्ताहाचे आयोजन केले होते . 

 

सप्ताहाच्या समापनासाठी प्रमुख अतिथि म्हणून प्रा डॉ नरेंद्र शिंदे शास्त्री लाभले . संस्कृत भाषा व्याकरणकार पाणिनी  विद्येची अधिष्ठात्री देवता श्री सरस्वतीच्या प्रतिमा पूजन  दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाचा प्रारंभ झालावेद उपनिषद  यांच्या ज्ञानवृक्ष प्रतिकृती संस्कृत प्रदर्शनी  उपस्थितांचे  लक्षवेधक बनल्या होत्या.

भारतीय  संस्कृतीचे मूळ वेद आणि शास्त्र आहेतसंस्कृतभाषेच्या  अध्ययनाने संस्कार आणि संस्कृतीचे संरक्षण होतेम्हणून प्रत्येकांनी संस्कृतभाषा शिकलीच पाहिजे असे प्रेरक मनोगत त्यांनी मांडले.

या सप्ताहात विद्यार्थ्यासाठी  संस्कृतानुच्छेदवाचनम् ,प्रश्नमंजुषा निबन्धलेखनम् श्लोकगायनम् , आशुभाषणम् , शलाकास्पर्धा संस्कृतगीतम्.


या स्पर्धांचे आयोजन केले होतेया स्पर्धांमध्ये विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहाने भाग घेतला. 

त्यामध्ये संजीवनी अग्रोयासानवी सास्तूरकरत्रिषा बाहेतीस्पन्दन वडगांवकरअबोलि  गोजमगुंडेवैष्णवी वाजपेयीअथर्व आमलेआशुतोष दानवेनील मंत्रीइशान तापडिया मयंक चौधरीआदित्य राठीया विद्यार्थ्यांनी प्रथम पारितोषिक मिळवले.  मुख्यातिथि  डॉ नरेंद्र शिंदेप्राचार्य कर्नल एस्श्रीनिवासुलुकुलसचिव प्रवीण शिवणगीकर, जयश्री पाटील यांनी पारितोषिक प्राप्त विद्यार्थ्यांचे कौतुक  केले. आमचे विद्यालय हे संस्कृत भाषेचे जतन आणि संवर्धन करण्यासाठी सतत प्रयत्नशील आहे . संस्कृतच्या विकासासाठी आपण सतत प्रयत्नशील राहिले पाहिजे असे विचार विद्यालयाचे प्राचार्य कर्नल श्रीनिवासुलू यांनी व्यक्त केलेकार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संस्कृत भाषा  विभागप्रमुख बल्लाळनाथ कुलकर्णी सुवर्णा कराड सुदर्शना कापसेदेवयानी देशपांडेविनोद चव्हाण यांनी आपले योगदान दिलेअबोली गोजमगुंडे  वैष्णवी बाजपाई या नववी वर्गातील विद्यार्थीनीनी संस्कृत भाषेत सुत्रसंचलन केले.

Post a Comment

أحدث أقدم