मराठवाडा मुक्तीसंग्राम अमृत महोत्सवानिमित्त विद्यार्थिनी समुपदेशन

 मराठवाडा मुक्तीसंग्राम अमृत महोत्सवानिमित्त विद्यार्थिनी समुपदेशन 

       

लातूर/प्रतिनिधी:येथील श्री केशवराज माध्यमिक विद्यालयात मराठवाडा मुक्तीसंग्राम अमृत महोत्सवी वर्षानिमित्त
विद्यार्थिनींच्या समुपदेशनाचा कार्यक्रम घेण्यात आला. 
   याप्रसंगी प्रमुख वक्त्या श्रीमती अनघाताई अंधोरीकर यांनी इयत्ता पाचवी व सहावीतील बारा -  तेरा वर्ष वयोगटातील विद्यार्थिनींना वयातील बदल,अभ्यासाचे महत्त्व, भावनिक सुरक्षितता तसेच शारीरिक स्वच्छता कशी ठेवावी याविषयाचे मार्गदर्शन केले.गुड टच बॅड टच याचे महत्त्व समजावून सांगितले.आई ही आपली सगळ्यात जवळची मैत्रीण असते.
दररोज आईशी संवाद साधला पाहिजे असे त्या म्हणाल्या.वेशभूषा, केशभूषा संस्कृतीला साजेशी असावी याची माहिती त्यांनी दिली.आई नंतर सगळ्यात जवळच्या शाळेतील बाई असतात. मनातील प्रत्येक गोष्ट अगोदर बाईंना सांगावी असेही त्या म्हणाल्या. 
       अध्यक्षीय समारोपात पर्यवेक्षिका श्रीमती अंजली निर्मळे म्हणाल्या की,विद्यार्थिनींनी आपल्या आरोग्याची पूर्ण काळजी घेऊन पूर्णकन्या ते माता यापर्यंतचा  प्रवास करण्यासाठी आपले आरोग्य महत्त्वाचे आहे.  आपल्या आरोग्याची काळजी घेतली पाहिजे. विद्यालयातील तक्रार पेटीचा देखील विद्यार्थिनींनी वापर करावा असे त्यांनी सांगितले.
    कार्यक्रमाचे सूत्रसंचलन व आभार प्रदर्शन मेघा सूर्यवंशी यांनी केले. प्रास्ताविक,परिचय व स्वागत श्रीमती मीरा चामवाड यांनी केले. श्रीमती कांचन तोडकर यांच्या कल्याणमंत्राने  कार्यक्रमाची सांगता झाली.
      कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मुख्याध्यापक प्रदीप कुलकर्णी,विद्यासभा संयोजक तथा 
उपमुख्याध्यापक महेश कस्तुरे,पर्यवेक्षक संदीप देशमुख,बबन गायकवाड,दिलीप चव्हाण,सर्व शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

Post a Comment

أحدث أقدم