‘सैनिक हो तुमच्यासाठी’ कार्यक्रमाचे जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजन

‘सैनिक हो तुमच्यासाठी’ कार्यक्रमाचे जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजन
लातूर : माजी सैनिकाच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी महसूल सप्ताह अंतर्गत जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन सभागृहात 5 ऑगस्ट 2023 रोजी सकाळी अकरा वाजता ‘सैनिक हो तुमच्यासाठी’ उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. तरी जिल्ह्यातील सर्व आजी, माजी सैनिक, माजी सैनिक विधवा पत्नी, शहीद जवानाच्या वीरपत्नी, वीरमाता, वीरपिता व त्यांचे अवलंबित यांनी या कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी ले. कर्नल (नि.) शरद पांढरे यांनी कळविले आहे.

महसूल विभागामार्फत 1 ऑगस्टपासून महसूल सप्ताह साजरा करण्यात येत आहे. त्याअनुषंगाने माजी सैनिकाच्या अडीअडचणी दूर करणे, त्यानां लागणारी महसूल विभागामार्फत प्रमाणपत्र, दाखले व इतर लाभ वितारणासाठी 5 ऑगस्ट 2023 रोजी ‘सैनिक हो तुमच्यासाठी’ उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यापूर्वी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयामार्फत या कार्यक्रमासाठी संबधित तहसिल कार्यालयात उपस्थित राहण्याबाबत कळविण्यात आले होते. मात्र हा कार्यक्रम लातूर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन सभागृहात 5 ऑगस्ट रोजी सकाळी 11 वाजता होणार आहे. 
तरी या कार्यक्रमास जिल्ह्यातील आजी, माजी सैनिक, माजी सैनिक विधवा पत्नी, शहीद जवानाच्या वीरपत्नी, वीरमाता, वीरपिता व त्यांचे अवलंबित यांनी त्यांच्या तक्रारी असल्यास सोबत निवदेन व संबधित कागदपत्रासह तक्रारीचे निवारण करणेसाठी अर्जदारांनी स्वत: उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी ले. कर्नल (नि.) श्री. पांढरे यांनी कळविले आहे.

Post a Comment

أحدث أقدم