पत्रकारावर हल्ला करणाऱ्या आ. किशोर पाटील यांची आमदारकी रद्द करावी औसा पत्रकार संघाची मागणी

पत्रकारावर हल्ला करणाऱ्या आ. किशोर पाटील यांची आमदारकी रद्द करावी औसा पत्रकार संघाची मागणी


औसा/ प्रतिनीधी : - पाचोरा येथील पत्रकार संदीप महाजन यांच्यावर झालेल्या भ्याड हल्याच्या निषेधार्थ शुक्रवार, दि. 18 ऑगस्ट रोजी शासकीय विश्रामगृह औसा येथे बैठक घेऊन निषेध व्यक्त करण्यात आला.या घटनेतील मारहाण करणाऱ्या आमदारांसह गुंडाविरुध्द पत्रकार संरक्षण कायद्यानुसार गुन्हा दाखल करावा.यासह आ.किशोर पाटील यांची आमदारकी रद्द करण्याच्या मागणीचे निवेदन औसा तहसीलदार यांना  औसा तालुका पत्रकार संघाच्या वतीने देण्यात आले.
       आमदार किशोर पाटील यांनी पत्रकार संदिप महाजन यांना माझ्या विरोधात बातमी का लिहिली म्हणून प्रथम शिवीगाळ केली, त्यानंतर आपल्या गुंडाकडून चौकात गाडी आडवुन,  अमानुषपणे मारहाण केली. यात ते गंभीर जखमी झाले असून सदरची घटना निंदनीय आहे.लोकशाहीच्या चौथा स्तंभ असणाऱ्या पत्रकारावर बातमी का दिली या कारणावरून मारहाण केली.या घटनेचा सबंध पत्रकारांच्या वतीने निषेध करुन पोलिस प्रशासनाने या घटनेची त्वरित दखल घेऊन गुन्हा दाखल करावा.जेणेकरून भविष्यात अशा घटना घडणार नाहीत.यावेळी वरील मागण्याचे लेखी निवेदन तहसीलदार यांना देण्यात आले. यावेळी पत्रकार संघांचे अध्यक्ष काशिनाथ सगरे ,सचिव महेबुब बक्षी, जेष्ठ पत्रकार राजू पाटील,संजय सगरे,राम कांबळे, एस.ए.काझी, उपाध्यक्ष बालाजी उबाळे, सहसचिव विनायक मोरे,विठ्ठल पांचाळ,विलास तपासे,,इलियास चौधरी,वामन अंकुश, श्रीधर माने,शिवाजी मोरे,महेश कोळी, एम बी मणियार आदी.उपस्थित होते.

Post a Comment

أحدث أقدم