अजीमच्या होतकरू विद्यार्थीनीना ऋषिकेश पाटील (वृक्षवल्ली परिवार ) तर्फे सायकलीचे वाटप

अजीमच्या होतकरू विद्यार्थीनीना ऋषिकेश पाटील (वृक्षवल्ली परिवार ) तर्फे सायकलीचे वाटप
औसा/प्रतिनिधी-भारतीय स्वातंत्र्याच्या 77 व्या वर्धापन दिन उत्सहात संपन्न, या निमित्त पर्यावरण प्रेमी, सामाजिक कार्य करणारे, औसा जन्मभूमी असणारे ऋषिकेश पाटील साहेब,सौ. उत्तरा पाटील, मुलगा सौमित्र पाटील व त्यांच्या वृक्षवल्ली परिवाराने आज अजीम हायस्कुल ला भेट देऊन, शाळेतील गरीब, होतकरू विद्यार्थिनाना सायकल वाटप करण्यात आल्या.
गरीब मुली शिक्षणापासून वंचित राहू नये, तसेच सायकल वापरल्याने एक व्यायाम तर होतोच शिवाय निसर्गातील प्रदूषण देखील कमी होते, ही प्राथमिक भावना ठेऊन, उदात्त हेतूने दरवर्षी औसा शहरातील चार ते पाच शाळेत जवळपास 20 सायकलीचे वाटप करण्यात येते.
जन्मभूमी औसा शहराची नाळ जपणारा युवक म्हणून त्याच्याकडे पाहिले जाते, प्रमुख पाहुण्यांचे स्वागत शाळेचे मुख्याध्यापक शेख निजोमोद्दीन साहेब यांनी केले... अजीम शाळेतील 1)कु. गिरी नंदिनी राजेंद्र. वर्ग 6 वा,2)कु. वेदपाठक येडेश्वरी अंबेकर.. वर्ग 5 वा,3)कु. जोगी ज्योती कानिफनाथ.. वर्ग 7 वा,4) कु. पठाण शाहिस्ता फेरोज.. वर्ग 8 वा,5)कु. इनामदार आयशा अक्रमअली .. वर्ग 9 वा या गरीब, होतकरू व हुशार विद्यार्थिनींना सायकल वाटप करण्यात आली.
या कार्यक्रमासाठी पर्यवेक्षक केसरे सर,शेख टी. एम. व डॉ. सिद्दीकी सर उपस्थित होते, या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन सांस्कृतिक प्रमुख मेटे सर यांनी केले.

Post a Comment

أحدث أقدم