‘परीसंवाद व कविसंमेलनाचे आयोजन’
लातूर/प्रतिनिधी-‘शब्दांकित साहित्य मंच’ तसेच ‘बाबासाहेब परांजपे वाचनालय’ लातूर व ‘साहित्याक्षर प्रकाशन’,अहमदनगर यांच्या वतीने दिनांक: ५ ऑगस्ट २०२३ रोजी सायंकाळी ५:०० वाजता बाबासाहेब परांजपे वाचनालय,जिल्हा क्रीडा संकुल,औसा रोड लातूर येथे,कवयित्री आशा डांगे यांच्या, “ प्रिय हा कण गॉड पार्टिकल आहे”या काव्यसंग्रहावर परिसंवादाचे आयोजन करण्यात आले आहे.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष छ.संभाजीनगर येथील ज्येष्ठ साहित्यिक,समीक्षक,विचारवंत डॉ.ऋषीकेश कांबळे हे आहेत. तर या काव्यसंग्रहावर भाष्य करणाऱ्या भाष्यकारांमध्ये प्रामुख्याने डॉ. जयद्रथ जाधव (अध्यक्ष,म.सा.प.लातूर),डॉ. संजय बोरुडे (प्रसिद्ध साहित्यिक व अनुवादक अहमदनगर),रचना (कवयित्री, कादंबरीकार, अनुवादक पाथर्डी) व प्रा. नयन भादुले राजमाने (लेखिका, कवयित्री, मुलाखतकार, लातूर) यांचा समावेश असणार आहे.
त्याचप्रमाणे डॉ.समाधान इंगळे (निवेदक, साहित्यिक छ. संभाजीनगर,उपाध्यक्ष प्र.ले.स. महाराष्ट्र राज्य)सुनील उबाळे (सुप्रसिद्ध कवी छ. संभाजीनगर)सुधीर अणवले (भारतीय भटक्या विमुक्त जमाती विकास संघटना, महाराष्ट्र राज्य) यांची विशेष उपस्थिती असणार आहे. या सत्राचे सुत्रसंचलन डॉ.मिना घुमे या करणार आहेत.
परिसंवादाच्या कार्यक्रमानंतर लगेचच निमंत्रित कविंच्या कविसंमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. कविसंमेलनाचे अध्यक्ष सुरेश गीर ‘सागर’ हे आहेत. सहभागी कवी कवयित्री डॉ. समाधान इंगळे, नरसिंग इंगळे, डॉ. क्रांती मोरे व विमल मुदाळे या आहेत. कविसंमेलनाचे सुत्रसंचलन डॉ.समाधान इंगळे करणार आहेत.
तरी सदर कार्यक्रमासाठी सर्वांनी उपस्थित राहावे अशी विनंती आयोजकांकडून करण्यात येत आहे.
إرسال تعليق