लक्ष्मी अर्बन बँके तर्फे होणार ऑनलाईन बँकींग सेवांचा शुभारंभ

लक्ष्मी अर्बन बँके तर्फे होणार ऑनलाईन बँकींग सेवांचा शुभारंभ

लातूर/प्रतिनिधी -मराठवाड्यातील नामांकित लक्ष्मी अर्बन को-ऑप. बँक लि; लातूर या बँकेच्या वतीने ग्राहकांच्या सेवेसाठी मोबाईल बँकिंग अप्लिकेशन, UPI, ATM/ RuPay Card, IMPS व QR कोड या ऑनलाईन बँकिंग सुविधांचा शुभारंभ व ग्राहक मेळावा दि. ११ ऑगस्ट २०२३ रोजी सायंकाळी ठिक ५ वाजता अग्रसेन भवन, व्यंकटेश शाळेसमोर, झिंगानापा गल्ली, लातूर येथे आयोजित करण्यात आला आहे. 

कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून माजी आमदार वैजनाथ दादा शिंदे (संचालक, मराठवाडा को- ऑप. बँक्स असोसिएशन तथा उपाध्यक्ष उस्मानाबाद जनता सह. बँक लि; उस्मानाबाद)हे उपस्थित राहणार आहेत, बँकेचे चेअरमन श्री. अशोकजी अग्रवाल यांच्या अध्यक्षतेखाली सदर कार्यक्रम होणार आहे. 

बँकेच्या रौप्य महोत्सवी वर्षात बँकेने डिजीटल बँकिंगकडे यशस्वी वाटचाल केली आहे. 
लक्ष्मी अर्बन बँक हि सर्व डिजीटल बँकिंग सुरू करणारी जिल्ह्यातील पहिली सहकारी बँक आहे. स्थानिक नागरिकांच्या व व्यापारी वर्ग यांच्या गरजा ओळखून बँकेने ग्राहकांसाठी विविध ऑनलाईन बँकिंग सेवा देण्याचा निर्णय घेतलेला आहे. बँकेने डिजीटल बँकींगच्या माध्यमातून मोबाईल बँकिंग, RTGS/ NEFT, UPI, IMPS, ATM/ RuPay Debit Card, QR Code, BBPS ईत्यादी प्रकारच्या सुविधा ग्राहकांना सेवेत उपलब्ध करून दिल्या आहेत. आता घरबसल्या सर्व बँकिंग सुविधा वापरता येणार आहेत. 
या ऑनलाईन बॅकींग सेवेच्या शुभारंभाला बँकेच्या सर्व सभासद, ग्राहक व हितचिंतकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन बँकेचे संचालक मंडळ, प्र. मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी केले आहे.

Post a Comment

أحدث أقدم