प्रा.संतोष कुंभार यांना पीएच.डी प्रदान
निलंगा :- महाराष्ट्र कॉलेज ऑफ फार्मसी, निलंगा येथील प्रा. संतोष पंडितराव कुंभार यांना स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड च्या वतीने फार्मसी शाखेत नुकतीच पीएच.डी पदवी प्रदान केली आहे. प्रा. संतोष पंडितराव कुंभार यांनी महाराष्ट्र कॉलेज ऑफ फार्मसी चे प्राचार्य डॉ एस. एस. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली "सिंथेसिस अँड बायोलॉजिकल इव्होल्युशन ऑफ सम नोवेल डेरिव्हेटिव्ह ऑफ टू अझेटिडींनॉन "या विषयावर संशोधन प्रबंध नांदेड विद्यापीठाकडे सादर केला होता. प्रा. कुंभार यांच्या संशोधन प्रबंधास विद्यापीठाने मान्यता देत त्यांना पीएच.डी पदवी देऊन सन्मान करण्यात आला. याबद्दल महाराष्ट्र शिक्षण समितीचे अध्यक्ष आदरणीय श्री विजय शिवाजीराव पाटील निलंगेकर साहेब यांनी प्रा डॉ. संतोष कुंभार यांचे अभिनंदन केले. व तसेच त्यांचा यथोचित सत्कार महाराष्ट्र कॉलेज ऑफ फार्मसी चे प्राचार्य डॉ एस. एस .पाटील व महाराष्ट्र पॉलिटेक्निक (डी फार्म )इन्स्टिट्यूट निलंगा चे प्राचार्य डॉ. बी. एन. पौळ यांच्या हस्ते करण्यात आला. याप्रसंगी महाविद्यालयातील सर्व वरिष्ठ प्राध्यापक वर्ग आदी उपस्थित होते.
إرسال تعليق