कृषि उत्पन्न बाजार समिती व पशुसंवर्धन विभागाच्या वतीने लंपी रोग प्रतिबंधक लसीकरण मोहिम
औसा(प्रतिनिधी)-कृषि उत्पन्न बाजार समिती,औसा व पशुसंवर्धन विभाग औसा यांच्या संयुक्त विद्यमाने लंपी रोग प्रतिबंधक लसीकरण मोहिम कृषि उत्पन्न् बाजार समिती,औसा जनावर बाजार येथे राबविण्यात आली.
या प्रसंगी बाजार समितीचे सभापती चंद्रशेखर सोनवणे, उपसभापती भिमाशंकरप्पा राचट्टे, संचालक युवराज बिराजदार ,धनराज जाधव,विकास नरहारे,राजाभाऊ औटी,गोविंद भोसले,शंकर पुंड, पशुसंवर्धन विभागाचे येथील डॉ.बोरोळे एम.एस.,डॉ. दीपक मुळे,शहानवाज शेख, केदारनाथ माने,बाजार समितीचे सचिव संतोष हुच्चे , सहा.सचिव अब्दुलहक्क शेख्, भुजंग सोमवंशी, सोमनाथ जाधव, महादेव कांबळे, रामेश्वर विभुते, कुरेशी समाजाचे अध्यक्ष नसीर कुरेशी, जनावर बाजारातील सर्व शेतकरी, पशुधन मालक उपस्थित होते.
إرسال تعليق