प्रा.महेबूब मंगरुळे यांना पीएच.डी. पदवी प्राप्त

प्रा.महेबूब मंगरुळे यांना पीएच.डी. पदवी प्राप्त
 औसा:- येथील आझाद महाविद्यालयात हिंदी विभागात कार्यरत प्रा.महेबूब मंगरुळे यांना स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ,नांदेड कडून पीएच.डी. पदवी मिळाली.त्यांनी डॉ.रणजीत जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली 'भुवनेश्वर उपाध्याय के साहित्य में व्यक्त जन जीवन'या विषयावर आपला शोधप्रबंध विद्यापीठास सादर केला होता.गुरुवार दिनांक २४ ऑगस्ट २०२३ रोजी त्यांची मौखिकी घेण्यात आली यासाठी बहिस्थ परीक्षक म्हणून डॉ. वंदन जाधव होते.त्यांच्या या यशाबद्दल महाविद्यालयाच्या वतीने त्यांचा शाल,श्रीफळ,पुष्पहार घालून सत्कार करण्यात आला.प्रा महेबुब मंगरुळे यांचे संस्था सचिव डॉ.अफसर शेख,अध्यक्ष प्रा.संजय कुलकर्णी, प्राचार्य डॉ.ई.यु.मासुमदार,उपप्राचार्य तनवीर जहागीरदार, सर्व सहकारी प्राध्यापक,शिक्षकेत्तर कर्मचारी, मित्रपरिवार,आप्तस्वकीयांनी अभिनंदन केले.

Post a Comment

أحدث أقدم