तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेत अजीम कनिष्ठ महाविद्यालयाच्या खेळाडूंचे घवघवीत यश

 तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेत अजीम कनिष्ठ महाविद्यालयाच्या खेळाडूंचे घवघवीत यश
औसा/प्रतिनिधी- देवताळा येथे झालेल्या तालुकास्तरीय मैदानी स्पर्धेत अजीम कनिष्ठ महाविद्यालयातील खेळाडूंनी घवघवीत यश संपादित करून लातूर येथे होणाऱ्या जिल्हास्तरीय मैदानी स्पर्धेसाठी खेळाडू पात्र ठरले आहेत.यामध्ये१) पवार विशाल-८०० मीटर धावणे प्रथम क्रमांक  ,२) शेख रिहान-३०००मीटर धावणे प्रथम क्रमांक ,३) जाधव अविनाश-थाळी फेक द्वितीय,४)जगताप सोमनाथ-भालाफेक,द्वितीय,५)साळुंके प्राची-१०० मीटर धावणे द्वितीय, उंच उडी प्रथम,६) शेख जैनब-२०० धावणे द्वितीय,७)वाघमारे मनस्वी-४०० मिटर प्रथम, लांब उडी प्रथम,८) सुरवसे आरती-८०० मीटर धावणे प्रथम,९)रिले४१०० संघ हे सर्व 19 वर्षे वयोगटातील मुले सर्व द्वितीय क्रमांक पटकावला आहे.
या सर्व विजयी खेळाडूंचे हिंदुस्तानी सोसायटीचे सचिव या. नगराध्यक्ष डॉ. अफसर शेख , अध्यक्ष  प्रा. संजय कुलकर्णी, प्राचार्य शेख एन .आय. पर्यवेक्षक प्रा. शेख दानिश तसेच सर्व प्राध्यापक, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थ्यांनी विजयी खेळाडूंचा सत्कार करून पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा देण्यात आल्या. या  खेळाडूंना सतत  मार्गदर्शन करणारे  प्रा. सलीम पठाण,प्रा. मुजाहेद पठाण तसेच  सय्यद जाकेरअली हे आहेत.

Post a Comment

أحدث أقدم