‘सॉफ्ट टिश्यु लिजन्स ऑफ द ओरल कॅव्हिटी’ हे पुस्तक दंत शाखेसाठी उपयुक्त ठरेल-डॉ. हनुमंत कराड

 ‘सॉफ्ट टिश्यु लिजन्स ऑफ द ओरल कॅव्हिटी’ हे पुस्तक दंत शाखेसाठी उपयुक्त ठरेल-डॉ. हनुमंत कराड 


 

लातूर– दंत रोग शास्त्रातील मुख रोगनिदान शास्त्र (Oral Pathology) व क्ष – किरण शास्त्र (Radiology) यातील महत्त्वपूर्ण पैलु ‘सॉफ्ट् टिश्यु लिजन्स ऑफ द ओरल कॅव्हिटी’ या पुस्तकाव्दारे डॉ. वर्षा सांगळे यांनी मांडले आहेत. त्यामुळे दंत शाखेतील विद्यार्थ्यांसाठी हे पुस्तक उपयुक्त ठरेल, असे मत एमआयडीएसआर दंत महाविद्यालयाचे कार्यकारी सांचालक डॉ. हनुमंत कराड यांनी व्यक्त केले.

लातूर येथील माईर एमआयटी पुणे संचलित एमआयडीएसआर दंत महाविद्यालयातील ओरल पॅथोलॉजी विभागातील सहयोगी प्राध्यापीका डॉ. वर्षा अजित सांगळे लिखित ‘सॉफ्ट् टिश्यु लिजन्स ऑफ द ओरल कॅव्हिटी’ या पुस्तकाचे मंगळवार, दि. 29 ऑगस्ट रोजी कार्यकारी संचालक डॉ. हनुमंत कराड यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. या प्रसंगी ते बोलत होते. यावेळी लेखिका डॉ. वर्षा सांगळे, प्राचार्य डॉ. सुरेश कांगणे, डॉ. यतीशकुमार जोशी हे उपस्थित होते.

दंत शाखेतील बी. डी. एस. पदवी अभ्यासक्रम, पदवी अतंर्गच्या सैध्दांतीक परीक्षा, दंत शाखेशी सबंधीत स्पर्धा परिक्षेचे विद्यार्थी यांच्याकरीता हे पुस्तक फायदेशीर असून ते ॲमेझॉन वर खरेदीसाठी उपलब्ध असणार आहे, अशी महिती लेखिका डॉ. वर्षा सांगळे यांनी दिली.

Post a Comment

أحدث أقدم