आर.आर.(आबा) पाटील सुंदर गाव म्हणून ग्रा.पं.उटी बु.पुरस्काराने सन्मानित

आर.आर.(आबा) पाटील सुंदर गाव म्हणून ग्रा.पं.उटी बु.पुरस्काराने सन्मानित 
औसा/प्रतिनिधी - लातूर जिल्हा प्रशासनाच्या वतीने महाराष्ट्र राज्याचे क्रीडा मंत्री संजय बनसोडे यांच्या हस्ते ग्रामपंचायत उटी बु. ता. औसा यांना आर.आर. आबा पाटील सुंदर गाव पुरस्कार 2020/21 जिल्हास्तरीय प्रथम बक्षीस स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने 
जिल्हाधिकारी कार्यालय लातूर येथे देण्यात आले. यावेळी गावच्या सरपंच वैशालीताई लक्ष्मण कांबळे ,उपसरपंच रफिक बाबुमीया शेख,माजी सरपंच ॲड. भालचंद्र पाटील,सदस्य बिभीषण रामा कांबळे ,माधुरी चंद्रकांत भोकरे,बळीराम हरिश्चंद्र शिंदे,प्रयाग तानाजी कांबळे,अनुसया रामदास भोजने ,भागवत मारुती लोंढे,सारीका देवीदास कांबळे ,मोनीका आशोक अंधारे,ग्रामसेवक महेश जगताप,संगणक ऑपरेटर अमर उबाळे, ग्रामपंचायत कर्मचारी महालिंग स्वामी गुंडू भोकरे, लक्ष्मण घोडके यांच्यासह उटी बु.येथील ग्रामपंचायतीस सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला.
यावेळी जिल्हाधिकारी श्रीमती वर्षा ठाकुर- घुगे,पोलिस अधीक्षक सोमय मुंडे, मुख्य कार्यकारी अधिकारी अनमोल सागर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पं) दत्तात्रय गिरी, गटविकास अधिकारी युवराज म्हेत्रे , विस्ताराधिकारी (पं)बालाजी तेलंग आदी.उपस्थित होते.

Post a Comment

أحدث أقدم