रामनाथ अध्यापक विद्यालयात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव विविध कार्यक्रमाने संपन्न

रामनाथ अध्यापक विद्यालयात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव विविध कार्यक्रमाने संपन्न
आलमला:- रामनाथ अध्यापक विद्यालय आलमला ता. औसा येथे स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवनिमित्त सर्व विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या शैक्षणिक साहित्याचे संस्थेतर्फे वाटप करण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता .या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रामनाथ शिक्षण संस्थेचे अध्यक्ष ॲड. उमाशंकर पाटील हे उपस्थित होते. तर प्रमुख अतिथी म्हणून श्री शिवाजी अंबुलगे उपाध्यक्ष, चनबसप्पा निलंगेकर, कोषाध्यक्ष ,ज्येष्ठ संचालक श्री मन्मथअप्पा धाराशिवे, श्री वीरनाथ हुरदळे ,शिवशंकर धाराशिवे, हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. सर्वप्रथम रामनाथ अध्यापक विद्यालयाच्या वतीने सर्व मान्यवरांचा प्राचार्य श्री कांचन कुलकर्णी यांनी शाल श्रीफळ देऊन सत्कार केला.त्यानंतर अध्यापक विद्यालयाच्या वतीने सर्व विद्यार्थ्यांना सन 2023-24 साठी लागणारे शैक्षणिक साहित्य व पुस्तकांचे वाटप मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले . याप्रसंगी प्राचार्य श्री कांचन कुलकर्णी यांनी प्रास्ताविकामधून सर्व विद्यार्थ्यांना नियमित कॉलेजमध्ये येऊन आपण चांगल्या गुणांनी डी.एड. ची पदवी प्राप्त करावी असे आव्हान केले.तर अध्यक्ष ॲड.उमाशंकर पाटील यांनी सर्व विद्यार्थ्यांचे रामनाथ शिक्षण संस्थेच्या परिसरात हार्दिक स्वागत करून सर्वांनी आपण शिक्षणासारख्या क्षेत्रात जाण्याचा जो निर्णय घेतला आहे त्याचे स्वागत केले. शिक्षणासारख्या पवित्र क्षेत्रात राहून आपण आपले व विद्यार्थ्यांचे भविष्य उज्वल करावे असे आवाहन केले .या कार्यक्रमासाठी श्री रामनाथ कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्राचार्या सौ.अनिता पाटील,दैनिक गुरुधर्मचे संपादक सुरेश हंचाटे ,प्रा.श्याम कोकाटे , प्रा.आमरजा कापसे , प्रा. फाजल फय्याज इत्यादी प्राध्यापक वर्ग,पालक ,विद्यार्थी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पी. सी.पाटील सर यांनी केले. तर आभार प्रदर्शन प्रा. शाम कोकाटे यांनी मांडले.

Post a Comment

أحدث أقدم