लातूर शहरातील युनिक पोल काढून टाकण्यासाठी युवक काँग्रेसचे मनपाच्या पायर्यांवर निदर्शने - मनपा आयुक्तांना दिले निवेदन
लातूर - लातूर शहरातील रस्त्यांवर, चौका चौकात चुकीच्या पद्धतीने बसवण्यात आलेले युनिक पोल काढून टाकण्यात यावेत, कारण या पोलांमुळे नागरिक व वाहनधारकांच्या जिवितास धोका निर्माण झाला आहे. त्यामूळे युनिक पोल काढून टाकण्यात यावे मागणीसाठी आज 9 ऑगस्ट रोजी दुपारी तीन ते चार वाजण्याच्या दरम्यान लातूर शहर जिल्हा युवक काँग्रेसच्यावतीने लातूर महानगरपालिकेच्या पायर्यांवर घोषणाबाजी करून निदर्शने केली तसेच मनपा आयुक्तांना सदरच्या मागणीचे निवेदन देण्यात आले. शहरातील सर्व युनिक पोल काढून टाकण्यात यावे व जे बसवण्यात येणार आहे ती कारवाई त्वरित थांबवावी अन्यथत्त युवक काँग्रेसच्यावतीने आणखी तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देखील यावेळी दिला. हे आंदोलन लातूर शहर जिल्हा युवक काँग्रेसचे इम्रान जब्बार सय्यद यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले.या आंदोलनात युवक काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होतेलातूर शहरातील युनिक पोल काढून टाकण्यासाठी युवक काँग्रेसचे मनपाच्या पायर्यांवर निदर्शने - मनपा आयुक्तांना दिले निवेदन
www.swaranpushp.com
0
إرسال تعليق