श्री मुक्तेश्वर प्राथमिक शाळेत स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा
औसा- श्री मुक्तेश्वर प्राथमिक विद्यामंदिर येथे स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत शाळेमध्ये श्री मुक्तेश्वर शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष शिवलिंग अप्प औटी यांच्या शुभहस्ते ध्वजारोहण करण्यात आले, याप्रसंगी संस्थेचे सचिव डॉ.बसवराज पटणे तसेच उपाध्यक्ष विजयकुमार मिटकरी सहसचिव प्रभू आप्पा माशाळे , कोषाध्यक्ष उमाकांत अप्पा मुरगे, संचालक रवी आप्पा राचट्टे ,प्रा.
रवींद्र कारंजे,सतीश आप्पा गारटे, बसवराज अप्पा वळसंगे, ॲड.रेवशेटे, नागेश अप्पा इळेकर यांची प्रमुख उपस्थिती होती. या दिनाच्या औचित्य साधून किशन कंट्रक्शन फुलमाळी ब्रदर्स, नवी मुंबई आदर्श शिक्षक श्री किसनराव फुल माळी सर यांच्या सौजन्याने फिल्टरेशन युक्त पिण्याचे पाणी यांचे उद्घाघाटन किशनराव फुल माळी संस्थेचे उपस्थित सर्व पदाधिकारी यांच्या हस्ते करण्यात आले व फुल माळी यांच्यातर्फे कबबुलबुल च्या विद्यार्थ्यांना गणवेश वाटप करण्यात आले यावेळी शाळेचे मुख्याध्यापक दिलीप कुमार माशाळे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले याप्रसंगी किशनराव फुल माळी सर यांनी आपले मनोगत व्यक्त केले विद्यार्थ्यांमध्ये लहान वयामध्ये नीतिमूल्य कशाप्रकारे जपली पाहिजे याची सविस्तर माहिती सांगितली याप्रसंगी शाळेतील सर्व शिक्षक शिक्षिका विद्यार्थी माता पालक पिता पालक शहरातील प्रतिष्ठित नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बालाजी भिसे यांनी केले तर सर्व उपस्थित यांचे आभार श्रीमती पुष्पा वर्मा यांनी मानले.
إرسال تعليق