श्री कुमारस्वामी कनिष्ठ महाविद्यालयाच्या पर्यवेक्षक प्रा.कदम यांची पदोन्नती

श्री कुमारस्वामी कनिष्ठ महाविद्यालयाच्या पर्यवेक्षक प्रा.कदम यांची पदोन्नती
औसा/प्रतिनिधी -श्री  कुमारस्वामी कनिष्ठ महाविद्यालयाचे पर्यवेक्षक प्रा. सि.जी.पाटील हे  सेवानिवृत्त झाले असून त्यांच्या जागी दिनांक 01 ऑगस्ट 2023 पासून महाविद्यालयाचे रसायनशास्त्र विभागाचे प्रा. मधुकर कदम यांना पर्यवेक्षक म्हणून पदोन्नती देण्यात आली.दिनांक 01 ऑगस्ट रोजी महंतस्वामी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष तथा पंढरपूर मंदिरे देवस्थान समितीचे अध्यक्ष ह.भ.प. गहिनीनाथ महाराज, संस्था सचिव गिरीश भैया पाटील यांचा हस्ते त्यांचा पदग्रहन सोहळा पार पडला व नविन  जबाबदारी देण्यात आली.यावेळी सर्व विश्वस्त यांच्या तर्फे त्यांना भावी वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या. या प्रसंगी सेवानिवृत्त प्रा.खानापुरे सर, प्रा.विलास जाधव सर, प्रा. मुळजे सर, प्रा. सी.जी.पाटील तसेच येथील वरिष्ठ, कनिष्ठ व एस सी व्ही सी महाविद्यालयीन कर्मचारी यामध्ये औसा तालुका जुक्टा अध्यक्ष प्रा.मिटकरी सर, काळे सर, मनगिरे सर , खिल्लारे सर,महावरकर सर,पटेल सर इंदलकर सर,पठाण सर,पवार सर, घुले सर, लहाने सर भोज सर, साबदे सर, सुळकेकर सर, गुट्टे सर, सौ.शिंदे मॅडम, कारंजे सर,रवी जाधव सर,सड्डू सर, अमित जाधव सर्वांनी उपस्थित राहून प्रा. कदम यांचा सत्कार केला.

Post a Comment

أحدث أقدم